उल्हासनगर-४ सुभाष टेकडी गोल्डन शाखा येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना शिबिरास महिलांचा उस्फुर्त प्रतिसाद.


उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर-४ सुभाष टेकडी गोल्डन शाखा येथे आमदार बालाजी किणीकर तसेच उपशहर प्रमुख श्री. संदिप डोंगरे यांच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे शिबीर आयोजित केले असून माझ्या मतदार संघातील प्रत्येक योजनेस पात्र महिलेला योजनेचा लाभ झालाच पाहिजे या भावनेने सदर शिबीर लावण्यात आले आहे.यावेळी नागरिकांचे नविन मतदार नोंदणीचे फॉर्म देखिल भरण्यात आले.
या प्रसंगी उपशहर संघटक श्री. कैलास गाडगे, शाखाप्रमुख श्री. सनी उपल ,श्री. सुदीप पिल्ले,उप शाखाप्रमुख सोहेल सिद्दीकी,युवासैनिक प्रभुद्धा झेंडे,महिला आघाडी,बचतगटातील महिला उपस्थित होते.