अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी लिमिटेड तर्फे शेतकरी मेळावा व मार्गदर्शन शिबिर सम्पन्न.
अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
अंबरनाथ सहकारी सामुदायिक शेतकी सोसायटी लिमिटेड अंबरनाथ च्या वतीने येत्या खरीप हंगामात पावसाळ्याच्या सुरवातीस उपक्रम राबविण्याकरिता उपयुक्त अशा विषयी तज्ञाचे मार्गदर्शनयुक्त शिबीर शनिवार, दि. ०१ जून २०२४ रोजी आयोजित केले गेले, या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. रविंद्र साठे, अध्यक्ष, खादी ग्रामोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, त्यांच्यासोबत ठाणे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्री रमेश सुरंग व कृषी पर्यवेक्षक श्री बाळा माने हे हजर होते साठे साहेबांनी मधुमक्षिका पालन या विषयावर भाषण देऊन माहिती दिली तसेच रमेश सुरंग व बाळा माने यांनी शासनाच्या विविध योजनेची माहिती शेतकरी बंधू भगिनींना दिली, तसेच श्री अजिंक्य नाईक व्यवस्थापक पिताम्बरी, अरविंद सुळे, प्रसाद गोसावी यानी मार्गदर्शन केले.
तसेच या शिबिराकरिता पर्यावरण व निसर्गप्रेमी तसेच शेती क्षेत्रात आस्था असणारे आपले परिचित, मित्रमंडळ यांनी देखील या मार्गदर्शनाचा लाभ घेतला, बांबू लागवड – बांबूचे प्रकार व्यावसायिक दृष्ट्या व आपल्या भागात लागवडीकरिता उपयुक्त बांबूच्या जाती, फळझाडे लागवड – पपई व ड्रगन फ्रुट लागवड आणि बदलापूर बांभूळ (मानांकन प्राप्त) बाबत माहिती, फुलझाडे लागवड – सोनचाफा लागवड, व्यवस्थापन व विक्री आणि तुळस लागवड व विक्री, खादी ग्रामोद्योग महामंडळ, महाराष्ट्र राज्य विशेष पुरस्कृत मधुमक्षिका पालन, व्यवस्थापन, विक्री ह्या विषयी श्री रविंद्र साठे व पिताम्बरी संस्थेतर्फे मार्गदर्शन करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष श्री विश्वास मस्के, सचिव दीपक पवार, उपाध्यक्ष सावर्डेकर तसेच संचालक मंडळ मधील श्री गणपत पाटील श्री कृष्ण राम परब सौ प्रतिभा पाटील श्री सुरेश म्हस्के हजर होते.