उल्हासनगरात नालेसफाईचा जाब विचारण्यासाठी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर-४ भरत नगर येथील नालागत सखोल परिसरात मागील वर्षी मुसळधार पावसामुळे नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले होते तसेच याही वर्षी घडू नये ह्या करिता नालेसफाई व्यवस्थित झाली आहे का,याची पाहणी केली तसेच याप्रसंगी नाण्याच्या पुलालगत असणारा कचरा लवकरात लवकर साफ करावा अशी ताकीद उल्हासनगर महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपशहर प्रमुख संदिप डोंगरे,सुधीर बागुल,मराठेजी ,सचिन अहिरे व स्थानिक नागरिक तसेच समाजसेवक उपस्थित होते.