आमदार गणपत गायकवाड तर्फे आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी भव्य रील (Instagram Reels) स्पर्धेचे आयोजन.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
आपल्या आराध्य दैवत श्री. गणेशाचे स्वागत आपण डिजीटल स्वरूपात करण्याची नाविन्य स्पर्धात्मक संकल्पना आपल्यासाठी मी घेऊन येत आहे.आपण आपल्या घरगुती/सार्वजनिक गणपतीची आकर्षक सजावट/एखादा सामाजिक संदेश देणारा रील बनवुन आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करायचा आहे.
नियम व अटी:
१. जास्तीत जास्त ९० सेकंद अथवा १. ३० मिनिटांचा व्हिडीओ असावा. (यापेक्षा जास्त कालावधीचा असल्यास व्हिडीओ बाद ठरेल)
२. व्हिडीओ पोस्ट करताना @mlaganpatgaikwad या इंस्टाग्राम व Ganpat Gaikwad – गणपत गायकवाड या फेसबुक अकाउंट ला टॅग करावी आणि #गणेशोत्सवरीलमहोत्सव व #आपलामाणूसआपलाआमदार हे दोन्ही हॅशटॅग वापरणे बंधनकारक आहे.
3. कोणताही पर्सनल वॉटरमार्क अथवा लोगो व्हिडीओ मध्ये ॲड करू शकत नाही
4. सर्व व्हिडिओ स्वतः काढलेले असावेत. (इंटरनेट किंवा इतर सोशल मीडियावरून कॉपी केलेले नसावेत)
5. व्हिडीओ पोस्ट करण्याची मुदत: १९ सप्टेंबर २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३
6. निकाल हा इंस्टाग्राम आणि फेसबुक या दोन्ही स्तरावरील सगळ्यात जास्त लाईक्स आणि व्हियूज या तत्त्वावर लावण्यात येईल.
7. ३ उत्कृष्ट रिल्सला पारितोषिक देण्यात येईल व त्यांचे व्हिडीओ आमच्या ऑफिशल पेजवर रीपोस्ट केले जातील. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल.
प्रथम पारितोषिक:- 11,111/- रोख
व्दितीय पारितोषिक:- 7,777/- रोख
तृतीय पारितोषिक:- 5,555/- रोख
तीन उत्तेजनार्थ पारितोषिक:- 3,333/- रोख
अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक: 9338493384 (फक्त व्हाट्सअप मेसेज)