जलशुद्धीकरण केंद्रात उल्हास नदीचे पाणी : कल्याण पश्चिमेसह या भागांचा पाणी पुरवठा बंद.

कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या टिटवाळाजवळील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रामध्ये उल्हास नदीचे पाणी शिरले आहे. त्यामुळे हे जलशुद्धीकरण केंद्र सध्या बंद करण्यात आल्याची माहिती केडीएमसीतर्फे देण्यात आली आहे. तसेच नदीतील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर हे जलशुद्धीकरण केंद्र सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत होईल असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या भागांतील पाणी पुरवठा बंद…
जलशुद्धीकरण केंद्र बंद झाल्याने केडीएमसीच्या अ प्रभातगातील मांडा, टिटवाळा, उंबरणी , बल्याणी, आटाळी, आंबिवली, मोहने, वडवली आणि कल्याण पश्चिमेकडील काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे देण्यात आली आहे.