Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची ‘अभय योजना’ – मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीवर १००% सूट.

कल्याण: नीतू विश्वकर्मा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका नागरिकांसाठी विशेष ‘अभय योजना’ लागू करत आहे. या योजनेअंतर्गत मालमत्ता कर आणि पाणीपट्टीवरील शास्ती (व्याज/दंड) वर १००% सूट देण्यात येणार आहे. ही योजना केवळ १५ जानेवारी २०२५ पर्यंत वैध आहे.
महानगरपालिकेने नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. येणाऱ्या थकबाकी कमी करण्यासाठी व दंडाची संपूर्ण माफी मिळवण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. वेळेअगोदर प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे प्रशासनाने आवाहन केले आहे.
अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधा.