Ulhasnagar festival
*आजच्या दिनी अभिवादना सोबत हा संकल्प करु “सावित्रीबाई” उल्लेख टाळून “सावित्रीमाई” चा आग्रह धरु.*
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
आज आपण सगळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावावर व्यक्त होण्याचा हक्क बजावतो. परंतु, एक काळ असा होता, जेव्हा व्यक्त होणे तर दूरच, परंतु विचार करायचा, तर त्यासाठीही ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागत असे. यात अतिशयोक्ती अजिबात नाही. परकीयांची दहशतच एवढी होती, की कोणीही बंड पुकारण्याचे साहस करत नसे. अशा पारतंत्र्याच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्याबरोबर आपल्या पत्नीला शिकवून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला. त्यांच्यामुळेच आज सावित्रीच्या लेकी हर एक क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊन आपली आणि समाजाची प्रगती करत आहेत. म्हणून जयंती तसेच पुण्यतिथी निमित्त अशा थोर विभूतींचे स्मरण करणे आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, ही आपली जबाबदारी आहे.
अलिकडच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लाभ घेत सर्वच समाजातल्या वर्गातून समाजमाध्यमाचा वापर करित जयंतीनिमित्त शुभेच्छा आणि स्मृती दिनानिमित्त अभिवादन केले जाते.यासाठी बहुतेक जण विविध समाजमाध्यमातील अँप्स वर उपलब्ध होणाऱ्या डिजाईनचा वापर करतात तर कित्येक जण हे स्वतः संगणकावर,मोबाईलवर आकर्षक डिजाईन बनवून मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देतात,अभिवादन करतात.अगदी स्वतः चा पक्ष,संस्था,संघटना अथवा वैयक्तिक किंवा सार्वजनिक स्वरूपात.परंतु हे सर्व करत असताना ते जाणीव ठेवून केल जात की, उत्साहाने हा प्रश्न महत्त्वाचा आहे.जाणीव ठेऊन केल जात तर मग ते आदरपूर्वक झालं पाहिजे आणि उत्साहात केल जात असेल तरी ते आदरपूर्वकच केल गेल पाहिजे.
पण येथे खेदाने म्हणावं लागत की,जी लोकं उत्साहाच्या भरात शुभेच्छा अथवा अभिवादन करतात ती लोक त्या थोर विभूतींचे स्मरण आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना एकप्रकारे त्यांचा अवमानच करत असतात.आपल्या देशात दुर्लक्षित,जातीव्यवस्थे मध्ये होरपळलेल्या समाजाच्या जागृती आणि उद्धारासाठी या थोर विभूतींनी मोठ्या खस्ता खाल्ला अगदीच आज आपण ज्यांची जयंती साजरी करत आहोत त्या सावित्रीमाईचे उदाहरण आपल्याला सर्वश्रुत आहे.सावित्रीमाईंना जातीवाद्यांचा किती त्रास सहन करावा लागला. त्यांना किती कुचेष्टा सहन करावी लागली ती आपल्या कल्पनाशक्ती च्या पलीकडील आहे.
प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले.याबद्दल जातीवाद्यांनी त्यावेळी सावित्रीमाईंना भयंकरच त्रास दिला परंतु सावित्रीमाई हयातीत नसताना देखील या जातीवाद्यांनी पद्धतशीरपणे हेतुपुरस्सर सावित्रीमाईंचे खच्चीकरण होईल अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली.सावित्रीबाई हा उल्लेख त्याचेच एक उदाहरण आहे.हा त्या माऊलीचा अपमान नव्हे काय? जातीवाद्यांच्या खोडसाळपणा मुळे सावित्रीबाई हा उल्लेख जरी प्रचलित असेल तर मग सावित्रीमाई असा उल्लेख रुढ करणे आपले कर्तव्य आपली जबाबदारी नाही का?
क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई,तुझ्या ऋणातून कसे होऊ आम्ही उतराई!! आद्य आणि वंद्य तू आमची वंदनीय सावित्री माई!!…