Breaking NewsheadlineHeadline TodaypoliticsUlhasnagarUlhasnagar Breaking News

वाढत्या,जीवघेण्या अपघातांना कारणीभूत असलेल्या नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले बार,रेस्टॉरंट,फास्टफूड कॉर्नर,डान्सबार यांच्यावर कडक कारवाई करणे बाबत म न वा से चे पोलीस प्रशासनाला निवेदन.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा


सोमवार दि.१८ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेमंड शोरूम जवळ, शांतीनगर, उल्हासनगर-३ येथे एका नशेत असलेल्या ड्रायव्हर कडून भरधाव वेगात असलेल्या कारच्या धडकेने झालेल्या एका भीषण अपघातात ३ प्रवाश्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि ३ जणांना गंभीर दुखापत झालेली असल्याने रुग्णालयात उपचार घेत आहेत.

हा अपघात एवढा भयंकर होता की ज्या रिक्षेला या कारणे धडक दिली त्या रिक्षेचा अक्षरशः चक्काचूर झालेला आहे,रस्त्यावर उभ्या असलेल्या दुचाकी,चारचाकी गाडयांनाही या कार ने धडक दिली,कार चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा भीषण अपघात झाला आणि ३ निष्पाप प्रवाश्यांना आपला जीव गमवावा लागला.

या अश्या जीवघेण्या अपघातांना,शहरातील वाढत्या गुन्हेगारीला रात्री उशिरापर्यंत उघडे असलेले बार, रेस्टॉरंट, फास्टफूड कॉर्नर,डांसबार हे सर्वस्वी जबाबदार आहेत.

तरी शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायची असल्यास,निष्पाप नागरिकांच्या जीवांचे रक्षण करायचे असल्यास नियमबाह्य पद्धतीने रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले बार,रेस्टॉरंट,फास्ट फूड कॉर्नर आणि डांसबार यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अश्या बेकायदेशीर आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या अस्थापणांच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल आणि या आंदोलनातील होणाऱ्या परिणामांना पोलीस प्रशासन सर्वस्वी जबाबदार असेल अश्या आशयाचे निवेदन आज उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विजय वाघमारे यांना देण्यात आले.

  

यावेळी मनवासे चे  जिल्हा अध्यक्ष प्रणय साटम,शहर संघटक काळू थोरात,मैनुद्दीन शेख मा.शहर संघटक (मनसे ),बादशहा शेख,संजय नार्वेकर,अमित फुंदे,राहुल वाकेकर,अश्फाक शेख,संजय चकोर,अशोक लोंढे,प्रदीप कुवर,अजय इंगोले उपस्थित होते.






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights