अंबरनाथ शिवसेना शहर शाखा व अरविंद वाळेकर यांच्या वतीने श्रावण मासात शिवमंदिरला जाण्यासाठीभाविकांना दर सोमवारी मोफत रिक्षासेवा.






अंबरनाथ : नीतू विश्वकर्मा
मुंबईपासून अवघ्या ६० कि.मी अंतरावर असलेलं अंबरनाथचं शिव मंदिर, हे भारतातील प्राचीन मंदिरांपैकी एक आहे, जिथे अनेक भाविक -भक्तगण नेहमीच दर्शनासाठी तसेच त्याच्या सौंदर्य पाहण्यासाठी येत असतात त्याच अनुषंगाने आज श्रावण महिन्याचा पहिला श्रावणी सोमवार त्यानिमित्ताने अनेक ठिकाणहून येणाऱ्या भाविकांसाठी शिव मंदिरात जाण्या-येण्याकरिता शिवसेना शहर शाखा व शहरप्रमुख श्री.अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून मोफत रिक्षा सेवा आयोजित करण्यात आलेली आहे.
सकाळी त्याचा शुभारंभ करण्यात आला, आजच त्याचा प्रथम दिवस असून दुपारपर्यंत एकूण ३५० भाविकांनी त्याचा लाभ घेत शिव मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले. हा उपक्रम श्रावण मासातील सर्व सोमवारी मोफत चालू असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते प्राचीन शिवमंदिर व प्राचीन शिवमंदिर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी सकाळ ते संध्याकाळ सुविधा असणार आहे.आलेल्या भाविकांनी अंबरनाथ शिवसेना पक्षाच्या या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली आणि आभार ही मानले.
या उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्यासह,युवासेना निरीक्षक कल्याण भिवंडी लोकसभा अँड.निखिल वाळेकर,शिवसेनेचे राजेश शिर्के, पद्माकर दिघे, संभाजी कळमकर,अरविंद मालुसरे,किसन गायकर, अरुण सिंह, प्रकाश डावरे सर,सचिन गुडेकर, मिलिंद गान,सुरेश कदम,अमोल वाजे,भरत पेटकर,सोनू सिंह,मा.नगरसेवक संदिप भराडे,शशांक गायकवाड,युवासेनेचे स्वप्नील जाविर,स्वप्नील भामरे,महिला आघाडी संघटक सौ.निता परदेशी,कु.स्नेहल कांबळे,समस्त शिवसैनिक, पदाधिकारी,युवासेना,महिला आघाडी,कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.