शहराच्या मंजूर विकास आराखड्यानुसार भर चौकात आणि रस्त्याने बाधित होत असलेल्या जागेवर उ.म.पा. चे वादग्रस्त नगररचनाकार मुळे यांनी दिली बांधकाम परवानगी.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
प्रभाग समिती क्रमांक १,प्रभाग क्रमांक ५ मध्ये उल्हासनगर महानगर पालिकेच्या नगररचना विभागातून दि.५/७/२०२२ रोजी ७८/२२/३१६ ही बांधकाम परवानगी मंजूर करण्यात आली होती,परंतु उल्हासनगर महानगर पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यामध्ये सदर जागा ही भर चौकात आणि रस्त्याने बाधित होत असल्याचे स्पष्ट दिसून येत असतांना भाजप च्या नेत्यांच्या दबावामुळे भर चौकात बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे.
याआधीही वादग्रस्त नगररचनाकार मुळे यांनी याच भाजपाच्या नेत्याच्या सांगण्यावरून गार्डनसाठी आरक्षित असलेल्या जागेवर बांधल्या गेलेल्या ईमारतीला आर्थिक व्यवहार करून बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिलेला होता.