उल्हासनगर-५ मधील मातृ-पितृ छत्र हरपलेल्या निराधार भावंडाना बोडारे बंधू यांचा मदतीचा हात.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
एसटी कॉलोनी,न्यू नगर, उल्हासनगर – ५ येथील कै.सुरेश कांबळे व त्यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे त्यांची तीन मुले कु.नम्रता(इ.३ री),चि.संभव(इ.६ वी) व चि. पवनकुमार (इ.७ वी) यांच्यावर अतिशय मोठं संकट उभे राहिले.या मुलांचं पुढे कसं होणार या चिंतेत असलेली त्यांची आत्या अनिता कांबळे यांनी अंबाजी चव्हाण उपशाखा प्रमुख यांच्याकडे गेली व त्यांनी संतोष सानप यांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हा प्रमुख माननीय चंद्रकांत बोडारे व जिल्हा समन्वयक माननीय धनंजय बोडारे यांची भेट घेतली.मा.चंद्रकांत बोडारे व मा.धनंजय बोडारे यांनी या तीनही मुलांच्या शिक्षणाची व संगोपनाची जबाबदारी घेऊन त्यांची यापुढील सर्व व्यवस्था टिटवाळा येथील संजय गुंजाळ व माई गुंजाळ यांच्या पारस आश्रमशाळेत केली.संतोषनगर शिवसेना शाखेत ही तीनही मुले आल्यानंतर बोडारे बंधूनी केलेल्या मदतीमुळे त्या मुलांचा चेहरा आनंदित झालेला बघून विजय सावंत,कणसे काका,प्रा.प्रकाश माळी सर व संभाजी चोरघडे यांच्यासह सर्वच शिवसैनिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले.