पत्रीपुलावरून येण्या जाण्यासाठी पादचाऱ्यांचा धोकादायक प्रवास.
कल्याण: नीतू विश्वकर्मा
कल्याण पूर्वे – पश्चिमेला जोडणारा आई तिसाई देवी उड्डाणपूल म्हणजेच पत्रीपुलावरून येण्या – जाण्यासाठी पादचाऱ्यांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. या पुलावरून नागरिकांना ये – जा करण्यासाठी असलेला मार्ग त्यासाठी कारणीभूत ठरत आहे.
पुलावर नागरिकांना चालण्यासाठी असलेला हा मार्ग कल्याण पश्चिमेच्या दिशेला जिकडे संपतो त्याठिकाणी एकदम खोल खड्डा झाला आहे. तसेच याबाबत कोणताही धोक्याची सूचना देणारा फलक किंवा संरक्षक कवचही त्याठिकाणी नाहीये. परिणामी नागरिक आपला जीव धोक्यात टाकून त्यावरून प्रवास करत आहेत. एका जागरूक नागरिकाने ही परिस्थिती समोर आणली असून यावर प्रशासनाने अपघात होण्यापूर्वीच तातडीने संरक्षक उपाय योजना करण्याची मागणी केली जात आहे.