उल्हासनगर – ४ सुभाष टेकडी परिसरात उभारण्यात येणार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर – ४ येथील सुभाष टेकडी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या ठिकाणी ९ फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याकरिता राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने शासन स्तरावर सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यामुळे नगरविकास विभागामार्फत १ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत उल्हासनगर येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदे अगोदर सुभाष टेकडी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित पत्रकार बांधवांशी संवाद साधला व या पूर्णाकृती पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.
या पत्रकार परिषदेत उल्हासनगर महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, उल्हासनगर शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, शहर संघटक श्री. नाना बागुल, उपशहरप्रमुख श्री. संदीप डोंगरे, माजी नगरसेवक श्री. प्रमोद टाले, श्री. प्रशांत धांडे, युवासेना उपजिल्हाधिकारी श्री. युवराज पाटील, पुतळा स्मारक समिती अध्यक्ष श्री. अरुण कांबळे, सचिव श्री. अरुण काकळीज, खजिनदार श्री. सिद्धार्थ सावंत, उपाध्यक्ष श्री. रमेश गवई, सहसचिव श्री. प्रवीण खरात, श्री. प्रवीण भगत, अंतर्गत हिशोब तपासणी श्री. काशीराव ससाणे, सदस्य श्रीकृष्ण रोकडे, सौ. अनुराधा वानखेडे, डॉ. गोकुळदास अहिरे, श्री. सुबोध गोंडाणे, श्री. महेंद्र उबाळे, श्री. नितीन खरात, श्री. रावसाहेब खरात, व इतर पदाधिकारी उपस्थित होते.