उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भव मोहिम उद्घाटन सोहळा उल्हासनगर महापालिकेच प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांच्या हस्ते पार पाडण्यात आला.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रा अंतर्गत वैद्यकिय आरोग्य विभागामार्फत केंद्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी आयुष्मान भव मोहिम उद्घाटन सोहळा आज दिनांक १३/०९/२०२३ रोजी उल्हासनगर महापालिकेच प्रशासक तथा आयुक्त श्री. अजीज शेख यांच्या हस्ते पार पाडण्यात आला. सदर सोहळ्यास मा. अतिरिक्त आयुक्त (शहर) श्री. जमीर लेंगरेकर, मा. उपायुक्त (मुख्यालय) श्री. अशोक नाईकवाडे, मा. वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा मा. सहायक संचालक नगररचना श्री. ललित खोब्रागडे, समाजसविका- – श्रीम. मंगला चांडा, जनसंपर्क अधिकारी श्रीमती छाया डांगळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. रत्नमाला नांदगाव, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. विद्या चव्हाण, सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील, वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी व आशा स्वयंसेविका उपस्थित होते.
सदर मोहिम दिनांक १३ सप्टेंबर २०२३ पासून ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. या मोहिमे अंतर्गत वैद्यकिय आरोग्य विभागा मार्फत देण्यात येणान्या आरोग्य सेवा सुविधा जसे आभा ID. आयुष्मान कार्ड वाटप १८ वर्षावरील पुरुषांकरिता मोफत आरोग्य तपासणी, Sickle Cell आजार, लसीकरण व त्याचे फायदे, क्षयरोग, कुष्ठरोग असंसर्गजन्य आजार संसर्गजन्य आजार. Teleconsultation. e- Sanjeevani OPD Telemanas इत्यादी सेवा नागरिकांस मोफत देण्यात येतील असे मा. प्रशासक तथा आयुक्त यांनी सांगितले. तसेच केंद्र शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेचा सर्व उल्हासनगर महानगरपालिकेच्या नागरिकांनी नजीकच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जाऊन लाभ घ्यावा अस आवाहन केले.