आयुक्त विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती; डॉ. प्रशांत रसाळ आयुक्त पदासाठी आघाडीवर!

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
महत्त्वाच्या प्रशासकीय बदलांमध्ये, आयुक्त विकास ढाकणे यांची बदली उपमुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे त्यांना या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी निवडण्यात आले आहे.
दरम्यान, अंबरनाथ नगरपरिषदेचे सध्याचे प्रशासक डॉ. प्रशांत रसाळ यांची आयुक्त म्हणून नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाकडून अधिकृत आदेश लवकरच जारी होण्याची अपेक्षा असून, या बदलांमुळे स्थानिक प्रशासनात नवी दिशा मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हा निर्णय प्रशासनाच्या कारभाराला गती देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जात आहे.