वडोळगाव पुलासमोरील रस्ता न बनल्यास पैनल १२ नागरिकांतर्फे येत्या लोकसभा निवडणूक वर मतदान बहिष्कार.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर ३ येथील वालधुनी नदी वडोळगाव पुलासमोरील रस्ता अनेक महिने झाले खोदून ठेवला आहे, अनेक निवेदन बैठका घेऊन देखिल काम सुरू झाले नाही, वडोळगावात हजारो नागरिक व सेंट जोसेफ शाळेत हजारो विदयार्थी याच रस्त्याने ये-जा करतात, एप्रिल महिना अर्धा होत आला आहे, मे नंतर जुन महिना सुरू होईल पावसाळ्यात चालणे मुश्किल होईल येथे अपघात देखील होण्याची शक्यता आहे.
आयुक्त प्रशासकांनी ह्या विषया कडे लक्ष द्यावे, जर या आठवड्यात रविवार पर्यंत कामाला सुरुवात नाही झाली तर वडोळगावच्या रस्त्यासाठी पुन्हा एकदा सोमवारी गुलराज टॉवर चौक उल्हासनगर ३ येथे आंदोलन करण्यात येईल, व तरी सुद्धा दखल न घेतल्यास पैनल १२ नागरिकांतर्फे येत्या लोकसभा निवडणूक वर मतदान बहिष्कार करण्यात येईल.