समग्र शिक्षा विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता व जनजागृती राबविणे बाबत.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
दिनांक २८ मार्च २०२४ रोजी माननीय आयुक्त तथा प्रशासक श्री अजिज शेख साहेबांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांमध्ये निवडणूक साक्षरता राबविण्या करिता तातडीने बैठक आयोजित करण्यात आली होती . निवडणुकीची टक्केवारी वाढावी याकरिता जनजागृती होणे आवश्यक आहे. याकरिता आज तातडीने बैठक आयोजित करण्यात आली .यामध्ये उल्हासनगर कार्यक्षेत्रातील सर्व कॉलेज मधील प्राचार्य उपस्थित होते. सदर जनजागृती कार्यक्रम समग्र शिक्षा विभागा मार्फत घेण्यात आलेला आहे यामध्ये निवडणूक विभागाने सुद्धा सहकार्य केले आहे. सदर आढावा बैठक यशस्वी होण्याकरिता माननीय उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव, माननीय प्रशासनाधिकारी श्री दीपक धनगर ,निवडणूक विभाग प्रमुख विशाल कदम व समग्र शिक्षा विभागाचे अधिकारी श्रीमती संगीता लहाने उपस्थित होते. कार्यक्रमांमध्ये माननीय प्रशासनाधिकारी श्री दीपक धनगर साहेबांनी मार्गदर्शन केले व तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती संगीता लहाने यांनी केले.