Ulhasnagar MNS Protest: महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट व राज्यमंत्री तसेच आमदार, खासदार नगरसेवक ही सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची मनसेची मागणी.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) दिनांक १४ मार्च २०२३ रोजी शासन निर्णय क्रमांक काआआ -2013/प्र.क्र.233/कामगार _8 या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्रातील सर्व शासकीय कार्यालयातील १) अतिकुशल २) कुशल ३) अर्धकुशल ४) अकुशल ही सरकारी कर्मचाऱ्यांची पदे ठेकेदारा मार्फत भरण्यासाठी शासन निर्णय काढला आहे.या भरती साठी शासनाने ९ कंपन्यांची निवड केली आहे.शासनाच्या या धोरणामुळे शिक्षित व उच्चशिक्षित तरुणांची कुचंबना होणार आहे.उच्चशिक्षण घेऊन सुद्धा शासकीय नोकरीत ठेकेदाराच्या हाताखाली काम करावे लागणार आहे.त्यामुळे ज्या प्रमाणे महाराष्ट्र राज्यात शेतकरी आत्महत्या होतायेत त्याच धर्तीवर उदया नोकरीतील कुचंबनेमुळे महाराष्ट्रातील तरुणांवर ही वेळ येऊ नये म्हणून हा शासकीय निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव संजय घुगे व मनविसेचे जिल्हा अध्यक्ष धनंजय गुरव यांनी महाराष्ट्र सरकार कडे केली आहे.आणि जर हा शासकीय निर्णय रद्द करणार नसाल तर निवडणूक आयोगाने या पुढे महाराष्ट्रात निवडणुका न घेता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,आमदार,खासदार,कॅबिनेट मंत्री,राज्यमंत्री, नगरसेवक ही सर्व पदे सुद्धा निविदा काढून ठेकेदारा मार्फत भरण्यात यावीत यामुळे शासनाच्या पैशाची मोठया प्रमाणात बचत होऊन ते पैसे महाराष्ट्राच्या विकास कामासाठी वापरता येतील.अशी मागणी मनसेचे मा.शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केंद्रीय व राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
यावेळी उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,सुभाष हटकर,मा.शहर संघटक मैनऊद्दीन शेख,कामगार नेते दिलीप थोरात,विद्यार्थी सेनेचे शहर सहसचिव तन्मेश देशमुख,विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,योगीराज देशमुख,प्रमोद पालकर, उपविभाग अध्यक्ष देवा तायडे, विक्की जिप्ससन,यांच्यासह सुधीर सावंत, संजय नार्वेकर,अजय वानखेडे,अमित सिंग,रवि बागूल,निलेश धिवरे,बापू पलंगे,हेमंत मेरवाडे,श्याम फिस्के,यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.