केंद्रातील हुकूमशाही मोदी सरकार विरोधात उल्हासनगर काँग्रेसचे निषेद आंदोलन.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
विरोधी पक्षाच्या १४२ पेक्षा जास्त खासदारांना संसदेच्या दोन्ही सभागृहातून निलंबित केल्याबद्दल केंद्रातील भाजप सरकार विरुद्ध काळ्या फितूर लावून उल्हासनगर काँग्रेसचे निषेध आंदोलन.
भारतीय संसद ही देशाची सर्वोच्च संस्था आहे. हिवाळी अधिवेशन सुरू असताना संसद भवनाची सुरक्षा भेदून दोन तरुणांनी लोकसभेमध्ये स्मोक हल्ला केला. ही घटना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री यांनी केंद्र शासनाची भूमिकेबाबत स्पष्ट निवेदन करावे, अशी मागणी करणाऱ्या विरोधी पक्षाच्या 142 पेक्षा जास्त खासदारांचे भाजप सरकारने निलंबन केले आहे.
याच अनुषंगाने उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे केंद्रातील भाजप सरकारने निर्दयपणे केलेल्या लोकशाही मूल्यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी दि. २१ डिसेंबर २०२३ रोजी, नेहरू भवन, नेहरु चौक, उल्हासनगर-४२१००२ येथे दुपारी २ वाजता काळ्या फितुरी लावून , जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वा खाली मोदी सरकारचा निषेद करण्यात आला.
या वेळेस माजी अध्यक्ष राधाचरण करोतिया , प्रदेश प्रतिनिधी वज्जरुद्दिन खान , ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके , नाणिक अहुजा , माजी महापौर मालती करोतिया , कुलदीप ऐलसिंघानी , सुनील बेहरानी , अझीझ खान , अशेराम टाक , शंकर अहुजा ,मनीषा महाकाळे , प्रो गेमनानी , राजेश मल्होत्रा , फामिदा खान , शहबुद्दीन खान ,विद्या चौहान , राजकुमारी नारा ,सिंधुताई रामटेके , सुधा शास्त्री ,मनोहर मनुजा , श्याम मढवी , ईश्वर जागियासी ,विशाल सोनावणे ,डॉ धीरज पाटोळे , निलेश जाधव , संदीप बटुले , सॅम्युएल माऊची , वामदेव भोयर , अन्सारीजी , दीपक गायकवाड , योगेश शिंदे , सुलक्षण भालेराव , व मोठ्या प्रमाणात काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तिथ होते.