नाना बागुल आणि सिंधी समाजाचे नेते नंदलाल वाधवा यांचा रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश.

मुंबई : नीतू विश्वकर्मा
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल यांनी आज आपल्या समर्थकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला.तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी ही आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) या पक्षात जाहिर प्रवेश केल्याची अधिकृत घोषणा आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केली.
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ,ठाणे प्रदेश निरिक्षक सुरेश बारशिंग, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे, प्रसिद्धी प्रमुख हेमंत रणपिसे, महिला आघाडी राज्य अध्यक्षा चंद्रकांता सोनकांबळे, मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे , उषाताई रमलू , आशाताई लांडगे, अभयाताई सोनवणे, माजी नगरसेवक नाना बागुल, सिंधी समाज ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा, आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री ना .रामदास आठवले यांच्या शुभहस्ते माजी नगरसेवक नाना बागुल आणि नंदलाल वाधवा यांचे पुष्पगुच्छ देऊन रिपब्लिकन पक्षात स्वागत करण्यात आले.
नाना बागुल हे उल्हासनगर मधील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते आहेत.यांचा राजकीय, सामाजीक आणि प्रशासकीय प्रदीर्घ अनुभव आहे.उल्हासनगर आणि ठाणे जिल्हातल्या राजकारणात एक मातब्बर नेते आहेत.त्यांच्या कुंटुंबात त्यांच्या पत्नी आणि मुलगा नगरसेवक आहेत.उल्हासनगरच्या राजकीय घडामोडींचा त्यांना प्रंचड अनुभव आहे.या पूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षात जिल्हा अध्यक्ष म्हणुन काम केले होते.भारतीय दलित पँथर पासुन ते आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत.केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर आपला अतुट विश्वास असल्याने आपण रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश केल्याचे मनोगत नाना बागुल यांनी यावेळी व्यक्त केले.
नाना बागुल यांच्या पक्ष प्रवेशामुळे उल्हासनगर आणि ठाणे प्रदेश मध्ये रिपब्लिकन पक्षाला बळकटी मिळेल असा विश्वास ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा हे उल्हासनगर मधील यशस्वी उद्योजक आणि ज्येष्ठ समाजसेवक म्हणुन कार्यरत आहेत.त्यांना 45 वर्षापेक्षा जास्त उद्योग व्यवसाय आणि सार्वजनिक जिवन यांचा अनुभव आहे.भानुशाली रोलर फ्लोअर मिल,स्वामी शांती प्रकाश गुडस्,आणि मीलन ग्रुपचे ते चेअरमन आहेत.सिंधी समाजासहित सर्व समाजात समाजसेवेचा त्यांना दिर्घ अनुभव आहे.केंद्रिय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वाचे ते चाहते असल्याने आज त्यांनी रिपब्लिकन पक्षात ना.रामदास आठवले यांचे शुभ आर्शीवाद घेऊन रिपब्लिकन पक्षात जाहिर प्रवेश केला.