प्रजासत्ताक दिनानिमित्त उल्हासनगरच्या पॅनल १ मध्ये मनसे तर्फे चिमूकल्यांकरिता अनेक स्पर्धांचे आयोजन.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर मधील पॅनल क्रमांक १ मध्ये,तानाजीनगर,एम आय डी सी रोड,उल्हासनगर-१ येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ८ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते.
शेवटी स्पर्धेत विजयी ठरलेल्या स्पर्धकांना शिक्षणपयोगी पारितोषिके देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यात आला.
प्रत्येक परीसरांमध्ये २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे दिवस एखाद्या मोठ्या सणांसारखे आणि जल्लोषात साजरे झाले पाहिजेत आणि अगदी लहान वयापासूनच मुलांच्या मनांमध्ये देशभक्तीची भावना जागृत झाली पाहिजे हा अश्या उपक्रमांच्या अयोजनांमागील आपला उद्देश असल्याचे मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी सांगितले.
यावेळी शहर संघटक मैनुद्दीन शेख,वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात आणि सहकारी पदाधिकारी आणि मित्र मंडळी उपस्थित होती.