Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

Ulhasnagar News: उल्हासनगर मनसेच्या शिष्टमंडळाची शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला भेट.

 

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा 

नांदेड येथील रुग्णालयातील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज उल्हासनगर ३ येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाला, (Ulhasnagar Central Hospital) उल्हासनगर मनसेच्या (Ulhasnagar MNS) शिष्टमंडळाने भेट दिली असता त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांना अपुरे मनुष्यबळ, डॉक्टरांची कमतरता आणि आधुनिक यंत्रे हाताळण्यासाठी लागणारे ऑपरेटर यांची नियुक्ती तसेच रुग्णालयातील असुविधांच्या बाबतीत शासनाच्या संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे परंतु शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग आणि सार्वजनिक तसेच वैद्यकीय आरोग्य विभागाकडून कसलाही प्रतिसाद मिळत नसल्याने उल्हासनगर चे शासकीय मध्यवर्ती रुग्णालय हे असुविधांचे माहेरघर बनलेले आहे.


मुख्यमंत्र्यांचा गृह जिल्हा असतांना आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र हे कल्याण लोकसभेचे खासदार (Doctor Shrikant Eknath Shinde) आणि स्वतः डॉक्टर असतांना त्यांच्या कार्यक्षेत्रात शासकीय रुग्णालयांची अशी दयनीय अवस्था असणे ही शरमेची बाब असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. उल्हासनगर च्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील अत्यंत आवश्यक असलेल्या सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात तसेच पूर्ण वेळ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात यावी, आधुनिक मशिनरी उपलब्ध असून त्या हाताळण्यासाठी ऑपरेटर उपलब्ध करून द्यावेत अन्यथा गाठ मनसेशी (MNS).असल्याचेही जिल्हा अध्यक्ष सचिन कदम यांनी सांगितले.

यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, शैलेश पांडव, सुभाष हटकर, वाहतूक सेनेचे काळू थोरात, बादशहा शेख, अमित फुंदे, जगदीश माने, रवी बागुल, दीपेश धारिवाल, संतोष पायाळ तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.






Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights