तहसीलदार कार्यालयातील सेतूकेंद्र आठ दिवसात सुरु करा – मनसे

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर तहसील कार्यालतील सेतू केंद्र ( नागरी सुविधा केंद्र ) हे गेल्या एक ते दिडवर्षा पासून बंद असल्याने नागरिकांची मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे.हे नगरी सुविधा केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना नाईलाजाने एजंटचा सहारा घ्यावा लागत आहे.व यामुळे नागरिकांच आर्थिक व मानसिक नुकसान होत आहे.सरकारी नियमानुसार नुसार तुम्हाला ३५ रुपये भरून शासकीय दाखला मिळायला हवा परंतु सेतूकेंद्र बंद असल्यामुळे या दाखल्यासाठी १ हजार ते १२ शे रुपये मोजावे लागत आहेत.असा आरोप मनसे जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख व शहर अध्यक्ष संजय घुगे यांनी केला आहे.त्यामुळे हे सेतूकेंद्र तात्काळ सुरु करून नागरिकांना दिलासा दयावा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.हे निवेदन उपविभागिय अधिकारी ( SDO ) श्री विजयानंद शर्मा व तहसीलदार श्रीमती कल्याणी कदम यांना देण्यात आलं
महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राबविण्यात येत आहे व यासाठी रहिवाशी दाखला व उत्त्पन्नाचा दाखला बंधन कारक आहे.त्यामुळे सुद्धा तहसील कार्यालयात मोठया प्रमाणात गर्दी होत आहे.परंतु हे दाखले देतांना ती व्यक्ती खरोखर महाराष्ट्राची रहिवाशी आहे का..? किती वर्षांपासून महाराष्ट्रात राहते त्यांच्या आधारकार्ड वरील पत्ता हा महाराष्ट्राचा आहे का.? त्यांनी जमा केलेले कागदपत्र खरे आहेत का..? याची तपासणी होणे आवश्यक आहे. कारण ३ ते ४ हजार रुपये घेऊन असे दाखले बनवून देणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे सर्व कागदपत्रांची कसून तपासणी करण्याची मागणी ही मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.यावेळी जिल्हा अध्यक्ष बंडू देशमुख,शहर अध्यक्ष संजय घुगे, उपशहर अध्यक्ष सचिन बेंडके,रवी पाल, शैलेश पांडव, विभाग अध्यक्ष अक्षय धोत्रे,संकेत शिंदे,यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.