उल्हासनगर शिक्षण प्रशासनाला मनविसेने केले जागे.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने दिनांक १४ ऑगस्ट २०२३ पासून उल्हासनगर शहरांतील सर्व शाळा, महाविद्यालयांनी मराठी भाषेत ठळक नाम फलक लावण्यात यावा व वाढीव फी रद्द करण्यात यावी या संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका मा. आयुक्त साहेब, मा. अतिरिक्त आयुक्त साहेब आणि मा. शिक्षण अधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आले होते त्या निवेदनात त्यांना ७ दिवसाची मुदत देत आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता. त्या अनुषंगाने दिनांक २४ ऑगस्ट २०२३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना उल्हासनगर शहराच्या वतीने उल्हासनगर शहारातील शिक्षण संस्थेच्या बाबतीत चाललेला भोंगळ कारभाराविषयी उल्हासनगर महानगर पालिकेचे मा. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर साहेबांशी चर्चा करण्यात आली व त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष वैभव माधव कुलकर्णी, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन, उपशहर अध्यक्ष विजय पवार, उपशहर गोरख उदार, उपशहर ॲड. सन्नी खिलनानी, विभाग अध्यक्ष वैभव शिंदे, उपविभाग अध्यक्ष अक्षय साळवे इत्यादी उपस्थित होते.
मा. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर साहेबांनी दखल घेत त्याबाबतीत पत्रक महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेला दिले.