शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त उल्हासनगर छत्रपती प्राथमिक शाळा व हनुमान मंदिर परिसर येथिल गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना तसेच जेष्ठ नागरिक व गरजू महिलांना आमदार बालाजी किणीकर च्या वतीने वह्या व छत्री वाटप करण्यात आले.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिना निमित्त तसेच हिंदूहृदय सम्राट सरसेनापती माननीय बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण व विचारांचा वारसा पुढे नेता सालाबादा प्रमाणे ह्याही वर्षी उल्हासनगर छत्रपती प्राथमिक शाळा व हनुमान मंदिर परिसर येथिल गोर गरीब गरजू विद्यार्थ्यांना तसेच जेष्ठ नागरिक व गरजू महिलांना माझ्या वतीने वह्या व छत्री वाटप करण्यात आले.
यावेळी मा. नगरसेवक श्री.प्रमोद टाले,सौ. मिना सोंडे,उपशहर प्रमुख संदीप जी डोंगरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मा.विधानसभा अध्यक्ष श्री.बाळासाहेब गुंजाळ तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री.अनिल पावशे सर उपाध्यक्ष श्री.महादव दुबे शाखाप्रमुख श्री.हरीश गुंजाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक गण व जेष्ठ नागरिक उपस्थित होते.