Breaking NewsheadlineUlhasnagar
नगर भू-मापन विभागा कडून मालमत्तेची मोजणी करतांना आजूबाजूच्या मालमत्ता धारकांना विश्वासात न घेताच होते मोजणी.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
शासनाच्या नियमानुसार एखाद्या मालमत्तेची ( जागेची ) मोजणी करतांना त्या मालमत्तेच्या ( जागेच्या ) पुर्व,पश्चिम,उत्तर व दक्षिण बाजूला असणाऱ्या सर्व मालमत्तां धारकांना नोटीस देऊन मोजणीच्या दिवशी त्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी नोटीस बजावण्यात येते.परंतु भूमापन अधिकारी उल्हासनगर यांनी साईट नंबर 109 शिट नंबर 74,75 या जागेची व अशा अनेक जागांची मोजणी करतांना आजूबाजूच्या मालमत्ता धारकांना नोटीस न देताच अतितातडीने जागेची मोजणी करून उपविभागीय अधिकारी यांना अहवाल सादर केला जातो.विशेष बाब म्हणजे ज्या मालमत्तेची मोजणी करण्यात आली ती मालमत्ता ही उल्हासनगर महापालिकेच्या शाळा क्रमांक 19 व 22 या शाळेचे मैदान आहे व हे मैदान 1987 च्या ताबपावती नुसार महापालिकेच्या ताब्यात आहे.हे माहित असून सुद्धा जाणीवपूर्वक महापालिका प्रशासनाला याची पुर्व सूचना न देताच अतितातडीने या मैदानाची मोजणी केली गेली.उल्हासनगर महानगर पालिकेच्या वतीने ही मालमत्ता मिळकत पत्रिकेवर (PROPERTY CARD ) उल्हासनगर महानगर पालिकेच्या नावाची नोंद करण्यासाठी महापालिकेच्या वतीने या कार्यालयाला पुढील प्रमाणे पत्र व्यवहार सुद्धा करण्यात आला आहे.1) जा.क्र.उ.म.पा./मालमत्ता /1144/2015 दिनांक 22/02/2018 2 ) जा.क्र.उ.म.पा./ मालमत्ता / 53/2015 दिनांक 13/10/20 3 ) जा.क्र.उ.म.पा./ मालमत्ता 214/2015/दिनांक 19/03/21 असे असतांना सुद्धा भू-मापन अधिकारी उल्हासनगर यांनी या कडे दुर्लक्ष करून सदर जागेची मोजणी केली.व या मोजणी बाबत महापालिका प्रशासनाला कोणतीही नोटीस न देताच पूर्ण पणे अंधारात ठेवले.व सदर मालमत्तेची मोजणी करतांना पुर्व,पश्चिम,उत्तर व दक्षिणचे मालमत्ताधारक उपस्थित नसल्याचे दाखवून खोटा अहवाल तयार करण्यात आला.या संपूर्ण प्रकरणा बाबत मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी भू-मापन अधिकारी जयसिंग राठोड यांना दिनांक 14/12/2022 रोजी निवेदन देऊन व प्रत्यक्ष भेटून निदर्शनास आणून दिले होते की सदर मालमत्ता ही महापालिकेच्या शाळा क्रमांक 19 व 22 या शाळेचे मैदान असून ही मालमत्ता उल्हासनगर महापालिकेच्या मालकीची आहे.व ही मालमत्ता महापालिकेच्या ताब्यात आहे.तरी आपण या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होई पर्यंत प्रॉपर्टीकार्डवर कोणाचेही नवीन नाव चढवूनये किंवा पुढील कारवाई करू नये.परंतु नगर भू-मापन चे अधिकारी एवढे घाईत होते की ही सरकारी मालमत्ता लवकरात लवकर खासगी शाळेला त्वरित कशी बहाल करता येईल यासाठी ते प्रयत्नशील होते.त्यामुळे या अधिकाऱ्यांनी आमच्या पात्राची दखल न घेता पुढील कारवाई ही प्रचंड तत्परते केली.कारण या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी बंडू देशमुख यांनी जिल्हा भू-मापन अधिकारी बाबासाहेब रेडेकर यांच्याकडे केली आहे.तसेच या प्रकारणाशी संबधित अधिकारी व कर्मचारी या कालावधीत कोणाकोणाच्या संपर्कात होते याचा CDR सुद्धा तपासण्यात यावा कारण या प्रकरणासह अशी अनेक गैरप्रकार या कार्यालया कडून झाल्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे मागील तीन वर्षातील सर्व प्रकरणाची चौकशी होने आवश्यक आहे असेही बंडू देशमुख यांनी सांगितले.