उल्हासनगरात शहाड परिसरात गुटखा जप्त.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर मधील शहाड फाटक परिसरात खुलेआम गुटखा विक्री केले जाते. ही माहिती समजताच सामाजिक कार्यकर्ता दीपक ठाकूर आणि संदीप साळवे यांनी पोलिसांना कळविले असता शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या नेतृत्वाखाली धाड टाकण्यात आली या वेळी त्यांचा कडून 86 हजार किमतीचे विमल, ए.वन पान मसाला, पुकार अशा अनेक कंपनीचे गुटखे जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात नवनीत चौरसिया, नवंजीस अन्सारी, आलीत खान आणि इतर एक असे चार जनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना आज कोर्टात हजर केले असता त्यांना 12 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली आहे. संबंधित गुटखा कोणाकडून विक्री करण्यासाठी आणण्यात आला होता त्याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.