भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी UPSC,MPSC तसेच स्पर्धापरीक्षांचे मोफत प्रशिक्षण उपलब्ध करून दया- मनसे
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगर पालिकेच्या भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक अभ्यास केंद्रात दररोज जवळपास 450 ते 500 विद्यार्थी UPSC,MPSC तसेच स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येतात.या विदयार्थ्यांमधील बहुतांश विद्यार्थी हे सामान्य कुटुंबातील आहेत.हे विद्यार्थी या ठिकाणी अभ्यासा साठी जरी येत असले तरी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षासाठी योग्य योग्य मार्गदर्शनाची गरज भासते व आपल्या या अभ्यासकेंद्रात अशी सोय उपलब्ध नाही.या अभ्यासकेंद्रात अभ्यासासाठी येणारे बहुतांशी विद्यार्थी हे सामान्य कुटूंबातील असल्यामुळे या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थितीही बेताची असल्यामुळे या विद्यार्थ्यांना खासगी क्लासेसचा खर्च परवडत नाही त्यामुळे हे विद्यार्थी योग्य मार्गदर्शना पासून वंचित राहतात.त्यामुळे या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या माध्यमातून जर स्पर्धा परीक्षांचे वर्ग व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून दयावे अशी मागणी शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्त अजिज शेख व अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.जर या विद्यार्थ्यांना या अभ्यासकेंद्रात अत्याधुनिक शिक्षण पद्धती उपलब्ध करून दिल्यास त्याचा फायदा या विद्यार्थ्यांना होऊन उल्हासनगर शहरातील जास्तीतजास्त विद्यार्थी हे स्पर्धापरीक्षे मध्ये उत्तीर्ण होतील व यामुळे उल्हासनगर महानगर पालिका व उल्हासनगर शहराच नाव उंचावण्यासही मदत होईल असेही देशमुख म्हणाले.
तसेच या अभ्यासकेंद्रात शैक्षणिक कार्यक्रमा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी देण्यात येऊ नये कारण मालमत्ता विभागाकडून महापालिकेच्या इतर कार्यक्रमांना परवानगी दिल्यामुळे त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो व ही बाब योग्य नाही.तसेच या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी खालील सुविधाही तात्काळ काही उपाय योजना करणेही गरजेचे आहे.1) या अभ्यासिकेत अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संपूर्ण चौकशी करूनच प्रवेश देण्यात यावा.2) या अभ्यासिकेत अभ्यासाठी प्रवेश घेतल्यानंतर त्या विद्यार्थ्याला एक ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात यावं.3) अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची दररोज नोंदणी करण्यात यावी.4 ) या विद्यार्थ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यात यावे.5) अभयसिकेच्या स्वच्छतेसाठी जनरल शिप्ट मध्ये चार स्वच्छता कर्मचारी उपलब्ध करून दयावेत.यासह इतर मागण्या मनसेच्या वतीने करण्यात आल्या आहेत.यावेली शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शहर सचिव शालिग्राम सोनावणे,उपशहर अध्यक्ष ऍड.अनिल जाधव मनविसेचे तन्मेश देशमुख यांच्यासह ईतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.