तब्बल दोन वर्षे पाठपुरावा विवीध स्तरावर बैठका आणि चर्चा करून नवीन नळ जोडणी योजनेच्या कामाला सुरुवात-आमदार गणपत गायकवाड
कल्याण : नीतू विश्वकर्मा
श्री मलंग परिसरातील करोडो रुपये पाणी बिल वसुली थकीत असल्यामुळे एमआयडीसी मार्फत नवीन नळ जोडणीला स्थगिती देण्यात आली होती. यासंदर्भात आमदार श्री गणपत गायकवाड यांनी तब्बल दोन वर्षे कागदोपत्री पाठपुरावा तसेच विविध स्तरावर अधिकाऱ्यांशी बैठका आणि चर्चा करून नवीन नळ जोडणी योजनेला मंजुरी मिळवून योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नाऱ्हेन अंतर्गत मौजे करवले व कुंभार्ली या दोन गावांमधील गावकऱ्यांना एमआयडीसी कडून नवीन नळ जोडणीला स्थगिती करण्यात आली होती. त्यामुळे गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत होती. माननीय आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्याचा योग्य पाठपुरावा करून एमआयडीसी मार्फत नवीन नळ जोडणी योजनेला मान्यता मिळवून देऊन पुढील काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या कामात ग्रुप ग्रामपंचायत नाऱ्हेनचे माजी सरपंच समीर भंडारी, आशा नरेश पाटील व विद्यमान सरपंच माया हरेश पाटील यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य केले आहे.