Ambernath breaking newsBreaking NewspoliticsSocial

मोफत महाआरोग्य शिबिराचा २५०० हून अधिक अंबरनाथकरांनी घेतला लाभ.

 

अंबरनाथ: नीतू विश्वकर्मा 

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब व कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिम्मित वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष, डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी अंबरनाथ (पूर्व) येथील रोटरी क्लब येथे ” मोफत महाआरोग्य शिबिर” आयोजित करण्यात आले होते. या शिबिराला अंबरनाथकरानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात १६०० हून अधिक नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. 

या शिबिराला बाळासाहेबांची शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख श्री. गोपाळजी लांडगे साहेब, माजी नगराध्यक्ष श्री.सुनिल चौधरी, उल्हासनगर माजी नगरसेवक श्री.राजेंद्र चौधरी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख श्री.मंगेश चिवटे, माजी नगराध्यक्षा श्रीमती प्रज्ञा बनसोडे, उपशहर प्रमुख श्री.संदीप मांजरेकर, श्री. पुरुषोत्तम उगले, श्री.गणेश कोतेकर, माजी उपनगराध्यक्ष श्री.अब्दुलभाई शेख, माजी नगरसेवक श्री.उमेश गुंजाळ, श्री. सुभाष साळुंके, श्री.रवींद्र पाटील, श्री.रवींद्र करंजुले, श्री.संदीप तेलंगे, श्री.तुळशीराम चौधरी, श्री.लेनिन मुक्कु, श्री.शिवाजी गायकवाड, उल्हासनगर उपशहरप्रमुख श्री.संदीप डोंगरे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी श्री. युवराज पाटील, तालुका प्रमुख श्री.शैलेश भोईर, युवासेना शहर अधिकारी श्री.राहुल सोमेश्वर, श्री.निशाण पाटील तसेच बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या शिबिरात नेत्र चिकित्सा, मोतीबिंदु शस्त्रक्रिया व मोफत चष्मा वाटप, ऑर्थोपेडिक (हाडांचे विकार), किडनी संबंधित आजारांची तपासणी, व मोफत किडनी स्टोन शस्त्रक्रिया, इसीजी, हृदयविकार, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी स्त्री रोग चाचणी व उपचार, कर्करोग चाचणी व उपचार (महिलांसाठी मेमोग्राफी), नाक, कान, घसा (ENT), तपासणी व उपचार, रक्तगट तपासणी, जनरल ओ.पी.डी, मोफत औषधे वाटप करण्यात आले. या शिबिरादरम्यान १६०० हून अधिक नागरिकांना मोफत चष्मा वाटप करण्यात आले. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत या शिबिराचा लाभ घेतला.

या शिबिरात तपासणी केलेल्या रुग्णांना प्राधान्याने ठाणे जिल्ह्यातील विविध शासकीय रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार असून या शिबिरामुळे मोफत उपचार होणार असल्याने नागरिकांनी आमदार डॉ.बालाजी किणीकर व वैद्यकीय मदत कक्षाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights