गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून ओम शिव गोरक्षयोगी अस्थाना अहिल्यादेवी नगरात मोठया उत्साहात साजरी.

अहिल्यानगर : नीतू विश्वकर्मा
अहिल्यादेवी नगर निंबळक एम.आय.डी.सी परिसरात असलेल्या ओम शिव गोरक्षयोगी अस्थाना या ठिकाणी गुरुपौर्णिमा निमित्त आपल्या शिष्यांकडून गुरूवर्य नाथभक्त अशोक भाऊ पालवे यांचा आगमन सोहळा मोठया दिमाखात पार पाडला. सायंकाळी पाद्यपूजा झाल्यानंतर आपल्या लाडक्या गुरूंची मिरवणूक डिजेच्या व हलगीच्या तालावर नाचत नाथभक्त तल्लीन झाल्याचे पाहिला मिळाले.गुरु स्नान झाल्यानंतर महाप्रसादाचा आस्वाद घेत रात्री नाथभक्तिमय गीतांचा कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते.या वेळी मुंबई, ठाणे, सकल नाथभक्त कल्याण याच्या सह जिल्ह्यातील आपल्या लाडक्या गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी शेकडोच्या संख्येने भक्त उपस्थित होते.