म्हारळगावात कोसळले घर पण अद्याप प्रशासनाचा कानाडोळा.


म्हारळ : नीतू विश्वकर्मा
म्हारळगावातील क्रांतीनगर मधील असणारे रहिवासी निलेश देहकर यांचे घर कोसळले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही, परंतु अद्याप प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी दाखल न झाल्यामुळे स्थानिकामध्ये रोषाचे वातावरण आहे. घरातील महिला आणि मुले २ मिनिटा अगोदरच दुकानात गेल्याने मोठा अनार्थ टळला, मात्र घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले. घरासमोरील असलेल्या रिक्षाचेही मोठे नुकसान झाले असून, घराच्या मलब्याखालील स्थितीबाबत शास्वती नाही? ग्रामपंचायतीने व प्रशासनाने मदत करावी अशी देहकर कुटुंबाची मागणी आहे. अद्याप कोणताही प्रशासकीय अधिकारी पाहणी करण्यासाठी आलेले नाही घटनास्थळी ग्रामपंचायत प्रभारी सरपंच योगेश देशमुख,माजी सरपंच निलेश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते विवेक गंभीरराव,रविंद्र लिंगायत,देवानंद म्हात्रे, निकेत व्यवहारे यांनी घटनास्थळी भेट दिली.