उल्हासनगरात बोगस डॉक्टरांवर होणार कारवाई.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील योगस वेद्यकीय व्यावसायिक शोधून काढण्यासाठी उल्हासनगर महानगरपालिका स्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. सदर समितीची दिनांक १३/१२/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा मा. स्थायी समिती सभागृह येथे श्री, अजीज शेख, मा. प्रशासक तथा आयुक्त साहेब यांच्या अध्यक्षते खाली सभा आयोजित करण्यात आलेली होती. सदर सभेस श्रो, जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त, डॉ. सुभाष जाधव, उप आयुक्त (वैआवि), डॉ. मोहिनी धर्मा, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, श्री. राजा बुलानी, विधी अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त. उल्हासनगर विभाग यांचे प्रतिनिधी व प्रभाग अधिकारी तसेच वैद्यकीय अधिकारी, नागरी आरोग्य केंद्र-१ ते ६ हे उपस्थित होते, सदर सभेत झालेल्या चचंनुसार उल्हासनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये वैद्यकीय पथक गठीत करुन सदर पथका मार्फत नागरी आरोग्य केंद्र निहाय सर्व्हेक्षण करुन बोगस वैद्यकीय व्यावसाय करणारे डॉक्टर शोधून त्यांच्यावर नियमानुसार व प्रचलीत कायदेशीर तरतुदीनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात यावी, असे निर्देश मा, प्रशासक तथा आयुक्त साहेब यांनी दिलेले आहेत.