परिसरातील वृद्ध नागरिक,लहान-लहान मुले,महिला,सामान्य नागरिकांच्या आरोग्याला घातक असलेल्या शहरातील मोकाट,भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा अन्यथा आंदोलनाला सामोरे जा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
सध्या उल्हासनगर शहरात भटक्या कुत्र्यांचा सर्वत्र सुळसुळाट वाढलेला आहे, गल्ली-बोळांमध्ये,रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांनी नुसता हैदोस घातलेला आहे,वृद्ध व्यक्ती,लहान-लहान मुले,महिला वर्ग,सामान्य नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावे घेतलेले असल्याने या हिंस्र अश्या मोकाट,भटक्या कुत्र्यांचा सर्वसामान्यांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
तानाजीनगर,शिव-रोड,विठ्ठल अपार्टमेंट,एम आय डी सी रोड,उल्हासनगर-१ परिसरात तर भटक्या कुत्र्यांनी १०० पेक्षाही जास्त लोकांना चावे घेऊन जखमी केलेले आहे तसेच परिसरात भटक्या कुत्र्यांच्या संख्येत जास्त वाढ झालेली असल्याने आणि या भटक्या कुत्र्यांची विष्ठा रस्त्यावर,गल्ली-बोळांमध्ये,
घरांसमोर कुठेही पडलेली असल्याने परिसरात दुर्गंधीयुक्त घाण वास येत असतो.रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना मांसाहारी पदार्थ खायला घालणाऱ्या काही तथाकथित सोशल मीडियावरील बनावटी प्रेम दाखवणाऱ्या प्राणी मित्रांमुळे या परिसरात या अश्या मोकाट,भटक्या कुत्र्यांच्या संख्येत कमालीची वाढ झालेली असल्याने उल्हासनगर महानगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी अश्या भटक्या हिंस्र कुत्र्यांवर योग्य ती कारवाई करावी,तसेच अश्या रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांना मांसाहारी पदार्थ खाऊ घालून त्यांना अधिकच हिंस्र बनविणाऱ्या तथाकथित सोशल मीडियावरील बनावटी प्राणी मित्रांना ही त्यांची माहिती घेऊन तात्काळ समज दयावी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या निवेदनाची दखल घेऊन जनसामान्यांच्या आरोग्याशी निगडित असलेल्या या विषयावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा आमच्या परिसरातील अश्या भटक्या कुत्र्यांना उल्हासनगर महानगर पालिकेतील आपल्या दालनात सोडण्यात येईल असा निर्वाणीचा ईशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष कैलाश घोरपडे तसेच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाला दिलेला आहे.
यावेळी मनसेचे बंडू देशमुख,संजय घुगे,मैनुद्दीन शेख,विभाग अध्यक्ष कैलाश घोरपडे,बादशहा शेख,अनिल गोधडे,संजय नार्वेकर,विष्णू जाधव तसेच परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.