Breaking NewsCrimeheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

उल्हासनगर होणार अधिक सुरक्षित CCTV चे असेल लक्ष.

 

उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा

गृह विभाग, महाराष्ट्र शासन याचे माध्यमातून पोलिस प्रशासन दाणे जिल्हा अंतर्गत परिमंडल 4 उहागनगर शहरामध्ये सी. सी.टि.व्ही कॅमेरे बसवण्याचा अत्याधुनिक प्रकल्प राबविला जाणार आहे. याबाबत गृह मंत्रालयाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आलेला आहे. यामध्ये काही अपग्रेडेशन करणे गरजेचे असून यासाठी येणारा कैपिटल व ऑपरेशनल मेंटनन्स खर्च, महापालिका तसेच शहरासाठी त्याचा काय फायदा असणार आहे. किती कमराची गरज आहे याची सर्व तपासणी राज्य शासनामार्फत होत आहे. सदर प्रकल्पाबाबत मा. मुख्यमंत्री महादय देखिल आग्रही आहेत.
ठाणे शहर पोलिस आयुक्तालयातील परिमंडळ 1.23 व 4 या विभागात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणीबाबत दि. 05/07/2023 रोजी मा. अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली गृह विभाग, मंत्रालय, मुंबई येथे उच्च स्तरीय शक्ती प्रदत्त समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीतील मार्गदर्शक सूचनांच्या निर्णयावर अमलबजावणी करणेकरिता आज दि. 26/07/2023 रोजी ठिक 11.30 वा. उल्हासनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती दालनात बैठकांचे नियोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये डॉ. सुधाकर पठार, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-4. श्री. अजीज शेख, प्रशासक तथा आयुक्त, उल्हासनगर महागनगरपालिका, श्री जयराज कारभारी, उपविभागीय अधिकारी, उल्हासनगर, डॉ. प्रशांत रसाळ, मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद, श्री. योगेश गोडसे, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापुर नगरपरिषद, डॉ. करुणा जुईकर, अति आयुक्त (सेवा), श्री. जमीर लेंगरेकर, आंत आयुक्त (शहर), डॉ. सुभाष जाधव, उप-आयुक्त (मातवि), अमोल काळे, सहायक पोलिस उप आयुक्त व सर्व पोलिस निरीक्षक (हिललाईन, मध्यवर्ती बिलवाडी, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ), श्री. कन्नालु साहेब, सहा. पोलिस आयुक्त (बिनतारी संदेश विभाग, ठाणे (शहर), उमपातील सर्व प्रभाग अधिकारी क्र. 1 ते 4 श्रीम. श्रध्दा बाविस्कर, सिस्टम मैनेजर (मार्तवि), श्री. संदीप जाधव, उप अभियंता (सावावि), सौ. छाया प्रकाश डांगळे, जनसंपर्क अधिकारी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये श्री. कन्नालु साहेब, सहा. पोलिस आयुक्त (बिनतारी संदेश विभाग, ठाणे शहर) यांनी ठाणे जिल्हा अंतर्गत परिमंडळ- 1.2.3 व 4 करीता तयार करण्यात आलेल्या सविस्तर प्रकल्पाची मुदनिहाय सभागृहाला माहिती दिली. सदर प्रकल्पाचा DPR निश्चित झाल्यानंतर किमान एक वर्ष प्रकल्प उभारणीसाठी लागणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी अंदाजे खर्च रु.500 कोटी इतका असून यामध्ये Capital खर्च हा 60% Operation & Maintenance खर्च हा 40% असणार आहे. यामध्ये महानगरपालिका व पालिस विभागाच्या दृष्टीन फुट कॅमेरे लावणे गरजेचे आहे याचा संयुक्तरित्या सव्ह करून ठिकाण निश्चित करण्यात आलेली आहेत. सदर प्रकल्पामध्ये कोणत्या बाबीचा अंतर्भाव असणार आहे व यासाठी येणा-या खर्चामध्ये कशाप्रकारे संबंधित महानगरपालिका व नगरपरिषद यानी आपले योगदान दयायचे आहे. याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
उल्हासनगर शहरातील सामान्य नागरिकासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून शहरामध्ये सातत्याने घडत असलेले अनेक गैरप्रकार, चोरी व गुन्हे यांना प्रतिबंध करणेसाठी तसेच शहरातील धोकादायक इमारती. शहरामध्ये होणारी ट्रफिक, शहरामध्ये साठत असलेले पाणी पुरसदृश्य पाहणी, रस्त्यावरील खडू इत्यादी अनेक बाबीची माहिती याव्दारे Single: Click वर उपलब्ध होणार आहे. सदरचा प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी असून उल्हासनगर शहराला तसेच संबंधित लगतच्या शहरांना देखिल विकासाच्या व सुरक्षिततच्या दुष्टीने फायदा होणार आहे. सदरचा प्रकल्प हा पोलिस विभाग तसेच महानगरपालिकेला देखिल अतिशय उपयुक्त व फायदेशीर ठरणारा प्रकल्प आहे.
धोकादायक इमारती, शहरामध्ये होणारी ट्रफिक, शहरामध्ये साठत असलेले पाणी. पुरसदृश्य पाहणी, रस्त्यावरील खडे इत्यादी अनेक बाबीची माहिती याव्दारे Single Click वर उपलब्ध होणार आहे. सदरचा प्रकल्प हा अतिशय महत्वाकांक्षी असुन उल्हासनगर शहराला तसेच संबंधित लगतच्या शहरां देखि निर्माण करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights