उ.म.पा. शाळा क्रमांक ८, ११, २९ च्या पुर्न:बांधणी कामात भ्रष्टाचार.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका शिक्षण विभागाअंतर्गत विविध माध्यमांच्या २२ शाळा असून साडेचार हजारांपेक्षा जास्त मुले शिक्षणाचे धडे घेत आहेत. महापालिकेच्या शाळा ह्या १९६० पूर्वीच्या असल्याने जीर्ण तसेच दुरावस्थेत आहेत. त्याची पुर्न:बांधणी करण्यासाठी मनसेने तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे, उपायुक्त शिक्षण विभाग जमीर लेंगरेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता व त्यास सकारात्मक अनुकुलता देऊन प्रशासनाने पुर्न:बांधणी निविदा काढल्या होत्या.
शाळा क्र – ८, ११ व २९ पुर्न:बांधणी काम ए. एम. रामचंदनी या कंपनीला माहे ३०.०६.२०१७ मध्ये रक्कम ४,६३,०००/- साठी अठरा महिन्याच्या करारावर पूर्ण करण्यासाठी दिले होते. परंतु अजूनही जागेवरचे काम गार्डन, मेन गेट, शौचालय इत्यादी जवळ – जवळ १५ ते २० लाखांची कामे बाकी आहेत. असे असतांना सुद्धा कंत्राटदाराने अंतिम देयक मिळवण्यासाठी प्रयत्न केला असून त्याला २२.०५.२०२३ रोजी ए. एम. रामचंदानी यांनी खोटे बिल सादर करून महापालिका तिजोरीतील पैशांची लूट करणारे पत्र मा.आयुक्त साहेबांना सादर केले. मनसेच्या दणक्याने सदर बिल अकाउंट विभागातून परत माघारी पी.डब्लू. विभागात आणण्यात आले.
*प्रशासनास गंभीर इशारा…!* – मनसे आक्रमक
सदर बिल अदा करू नये असे पत्र दि.२७.०६.२०२३ रोजी देण्यात आले व त्यात ए.एम. रामचंदानी कंपनीचे अपूर्णकाम, कामात दिरंगाई तसेच अंतिम देयकासाठी प्रशासनाची दिशाभूल व इत्यादी कारणांमुळे ए. एम. रामचंदानी कंपनीला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मा.आयुक्तांना मनविसेचे उल्हासनगर शहर अध्यक्ष वैभव माधव कुलकर्णी यांनी आपल्या निवेदनातून केली आहे.