उल्हासनगर काँग्रेसच्या विविध विभागांच्या जिल्हा अध्यक्ष पदावर युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती व पक्षात ५० वर्ष पूर्ण करणाऱ्या श्री. आसाराम टाक यांचा सन्मान.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर काँग्रेसचे मुख्य कार्यालय गांधी भवन येथे पार पडलेल्या जिल्हा कमिटीच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना प्रदेश महासचिव श्री.ब्रिज दत्त यांच्या उपस्थितीत जिल्हा अध्यक्ष श्री. रोहित साळवे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. श्री.कौशल तिवारी यांची विज्ञान, तंत्रज्ञान व कौशल्य विकास या विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदी तसेच श्री.सुशिम सोनवणे यांची रोजगार व स्वयंरोजगार या विभागाच्या जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती प्रमाणपत्र देऊन नियुक्ती केली गेली.सदर नवनियुक्त जिल्हा अध्यक्षांना उपस्थित मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी काँग्रेस पक्षात ५० वर्षे पूर्ण करणाऱ्या काँग्रेसचे ज्येष्ठ, उल्हासनगर काँग्रेस प्रवक्ते नेते श्री.आसाराम टाक यांचा शाल, पुषगुच्छ व उपहार देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी बोलताना श्री. आसाराम टाक भावूक झाले, आपल्या भाषणात त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व यापुढेही काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी कार्य करत राहणार असे सांगत शुभेच्छांचा स्वीकार केला.उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांना जिल्हा अध्यक्ष श्री. रोहित साळवे यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत मिठाईचे वाटप केले.