Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News

उल्हासनगर मधील २५०आशा स्वयंसेविकाचे ७७ लाखांचे थकीत मानधन लवकरच मिळणार !

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आशा स्वयंसेवीकांचे एप्रिल 2024 ते जून 2024 पर्यंतचे प्रत्येकी ३० हजार या प्रमाणे २५० आशांचे  ७७ लाखांचे मानधन थकीत होते ,हे मानधन राज्य शासनाकडून आयुक्तालयाद्वारे दिनांक 7/8/2024 ला उल्हासनगर महानगरपालिकेला प्राप्त झाले होते असे असतानाही सणासुदीच्या काळातही आशांना हे तीन महिन्यांचे मानधन देण्यात आले नव्हते त्यामुळे  उल्हासनगर मधील जवळजवळ २५० आशा स्वयंसेविका आंदोलनाच्या तयारीत होत्या,तसे पत्रही आशा स्वयंसेविका च्या युनीयनने मा.आयुक्तांना दिले होते.


आशा स्वयंसेविका ज्या  अगदी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन लोकांची सेवा करतात, शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवतात, शासनाच्या सर्व प्रकारचे कामे त्यांच्यावर लादली जातात, तरी त्यांना अत्यंत तुटपुंजे असे मानधन मिळते. करोना सारख्या काळात आशांनी तळागाळातील लोकांपर्यंत जाऊन अगदी मोलाचे कार्य केले आहे ,खरंतर अशा महिलांना जेवढी काही मदत करता येईल जे काही मानधन देता येईल ते द्यायला हवे, इतर सर्व महानगरपालिकेत हे वाढीव मानधन लगेच देण्यात आलेले होते परंतु उल्हासनगर मध्ये मात्र हे देण्यात आलेले नव्हते ही गोष्ट आशांमार्फत नगरसेविका अंजली साळवे यांच्या लक्षात  आल्यानंतर त्यांनी माननीय आयुक्तांकडे काँग्रेस उल्हासनगर महिला काँग्रेस कमिटीच्या महिलांसोबत  मा.आयुक्तांची भेट घेतली व त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली व हे मानधन लवकरात लवकर देण्यात यावे अन्यथा उल्हासनगर महीला काॅग्रेस या आंदोलनात सहभागी होण्याचे निवेदनही दिले.

उल्हासनगर मध्ये नवीनच आलेल्या आयुक्त माननीय श्री विकास ढाकणे साहेब अत्यंत तडफदार व तत्पर निर्णय घेण्यात सक्षम आहेत ही त्यांची कार्यपद्धती उल्हासनगर मध्ये आल्यापासून सर्वांच्याच लक्षात आलेली आहे, त्यांच्यासमोर ही  गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तत्काळ  संबंधित विभागास मानधन देण्याचे आदेश दिलेत .

तसेच ११३ आशा स्वयंसेविकां व इतर कर्मचाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या सर्वे संदर्भातही केलेल्या कामाचा अंदाजे  ५ लाखाचा मोबदला ११ महिने होऊनही त्यांना मिळालेला नव्हता ही गोष्ट सुद्धा मा. नगरसेविका अंजली साळवे यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी संबंधित विभागास ते सुद्धा पैसे देण्याचे आदेश दिलेत.

यावेळी मा. नगरसेविका अंजली साळवे, उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. धर्मा मॅडम, उल्हासनगर महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा मनीषा महाकाळे,उपाध्यक्ष मालती गवई तसेच उल्हासनगरच्या निराधार विभागाच्या अध्यक्षा प्रा. सिंधू रामटेके व आशांच्या प्रतिनिधी छाया गडपाले ,पद्मा माने उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights