Breaking NewsEducationalheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewsSocial

रवी पाटील फाऊंडेशनतर्फे कल्याणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे लोकार्पण.

कल्याण  : नीतू विश्वकर्मा

युपीएससी – एमपीएससी परीक्षेच्या स्पर्धा परीक्षेसह गरजू विद्यार्थ्यांसाठी बांधण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर मोफत अभ्यासिकेचे आज लोकार्पण करण्यात आले. येथील बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ. नरेश चंद्र आणि कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले.


स्व. सौ. अनिता रवी पाटील यांच्या स्मरणाप्रित्यर्थ रवी पाटील फाऊंडेशनतर्फे ही मोफत अभ्यासिका उभारण्यात आली आहे. शिवसेनेच्या माजी स्थानिक नगरसेविका छायाताई वाघमारे यांनी महापालिकेच्या आरक्षित जागेवर अभ्यासिका उभारण्याची मागणी केली होती. ज्याला तत्कालीन सभागृहाने एकमताने मंजुरी दिली होती. तर या जागेवर अभ्यासिका बांधण्यासाठी तत्कालीन माजी आमदार नरेंद्र पवार यांचे सहकार्य आणि विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पाठपुराव्याने यासाठी निधी प्राप्त झाला आहे.

त्यातून याठिकाणी तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यावर 25 जणांच्या अभ्यासाची व्यवस्था असून पहिल्या मजल्यावर सध्या 4 संगणक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ज्यामध्ये येत्या काळात वाढ केली जाणार असल्याची माहिती यावेळी आयोजक रवी पाटील यांनी दिली. आपल्या दिवंगत पत्नीच्या नावे ही अभ्यासिका सुरू करताना आपल्याला अतिशय आनंद झाला असून याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून एकही रुपया घेतला जाणार नाही. तसेच याठिकाणी येणारा प्रत्येक विद्यार्थी हा आयपीएस आय ए एस व्हायला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कल्याण शहराचा पुणे नगरीप्रमाणे शिक्षण क्षेत्रात पुढे नेण्याचे आवाहन बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ नरेश चंद्र यांनी केले.


तर अशा प्रकारच्या अभ्यासिका या आता काळाची गरज बनल्या असून अधिकाधिक अशा वास्तू बनवण्यासाठी आपण प्रयत्न करू. तसेच रवी पाटील फाऊंडेशनतर्फे उभारण्यात आलेल्या या वास्तूच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक तो सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ असे आश्वासन आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी दिले.

या कार्यक्रमाला बिर्ला कॉलेजचे संचालक डॉ. नरेश चंद्र, प्राचार्य अविनाश पाटील, नाईट कॉलेजचे हरीश दुबे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख छायाताई वाघमारे, माजी सभागृह नेते श्रेयस समेळ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights