मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर ४ “कुष्ठरोगी महिलांना साडी वाटपाचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर – ४ येथे कुष्ठ वसाहत येथे माझ्या व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून “कुष्ठरोगी महिलांना साडी_वाटपाचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बाळासाहेबांची शिवसेनेच्या उल्हासनगर मधील पदाधिकाऱ्यांनी साडी वाटप करून सर्व महिलांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी जमलेल्या सर्व महिलांनी मुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांना वाढदिवसानिमत्त शुभेच्छा देत त्यांच्याकडून अशीच जनसेवा सातत्याने होत राहो ही सदिच्छा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला उल्हासनगरचे युवासेना शहर अधिकारी श्री. सुशील पवार, महिला आघाडीच्या सौ. मनीषा भानुशाली, बाळासाहेबांची शिवसेनेचे इतर पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.