उल्हासनगर कॅम्प क्र ४ पॅनल क्र.१३ सिद्धार्थ नगर मधील बुद्ध विहार समोर असलेल्या शेड दुरुस्त करण्यासाठी युवासेनेने बांधकाम विभागाला केली मागणी.



उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर युवासेना शहरप्रमुख सुशील व्ही. पवार यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या शिष्टमंडळाने दि: 25 जुलाई 2024 रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले.
पैनल क्र.१३ मधील सिद्धार्थनगर बुद्ध विहार चे खराब झालेले शेड तातडीने दुरुस्त करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सिद्धार्थनगर बुद्ध विहार येथे रविवारी सकाळी शेड कोसळला. शेडमुळे रहिवाशांना आणि परिसरात येणाऱ्या मुलांसाठी धोका निर्माण झाला आहे.
या शेडची तातडीने दुरुस्ती न केल्यास अपघात होऊ शकतो,शेड दुरुस्त करून सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली.
यावेळी यूवासेनेच्या संपूर्ण टीमच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.



