डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आयोजित गणेश दर्शन स्पर्धा – २०२३.
कल्याण : नीतू विश्वकर्मा
गणेशोत्सव म्हणजे उत्साहाचा, आनंदाचा आणि सकारात्मक ऊर्जा देणारा परिपूर्ण उत्सव. गणेशोत्सवाची आपण सारे जण संबंध वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. ‘पहा झाले पुरे एक वर्ष – वर्षाने एकदा हर्ष’ अशा अजरामर गाण्यांचे सूर कानी पडू लागतात आणि गणेशोत्सवाची सर्वत्र लगबग सुरु होते. कौटुंबिक स्तरावर आणि सार्वजनिक मंडळांकडून मोठ्या उत्साहात आपण आपल्या बाप्पाची मनोभावे सेवा – आराधना करतो. या उत्सवाचा आनंद हा शब्दांमध्ये मांडणे जरा कसरतीचेच.. या उत्सवादरम्यान माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील सर्व गणेशभक्तांचा आनंद अधिक द्विगुणित करण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने ”उत्सव बाप्पाचा… वारसा संस्कृतीचा” हे घोषवाक्य घेऊन ”गणेशोत्सव स्पर्धा – २०२३” चे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती आणि सार्वजनिक अशा दोन विभागांमध्ये ही स्पर्धा होईल. परंपरा आणि आधुनिकतेची जोड देत सर्व नागरिकांसाठी या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने या स्पर्धेत सहभाग घेता येणार आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत नागरिकांनी आवर्जून सहभाग नोंदवावा.
कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून कल्याण लोकसभा क्षेत्रातील सुजाण गणेश भक्तांच्या कल्पकतेतून निर्माण होणारे व सामाजिक विषयांना प्राधान्य देणारी दर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
सदर गणेश दर्शन स्पर्धा दोन विभागात आयोजित करण्यात आली आहे.
१) सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धा.
२) घरगुती गणेश दर्शन स्पर्धा.
सदर स्पर्धा खालील विषयांवर आधारित घेण्यात येईल
प्रत्येक विषयासाठी १ ते ५ क्रमांक व उत्तेजनार्थ ५ क्रमांक अशी एकूण १० पारितोषिके आणि देण्यात येतील.
स्पर्धेची संपूर्ण माहिती, अटी शर्ती ऑनलाइन फॉर्म मधे देण्यात आलेली आहे
सार्वजनिक व घरगुती गणेश स्पर्धेसाठीचे विषय
१) गणेशाची आगमन व विसर्जनाच्या मिरवणुकीची
१) रिल
२) व्हिडिओ
२) उत्कृष्ट सजावट देखावा स्पर्धा
१) पर्यावरणपूरक सजावट
२) सामाजिक संदेश
३) आकर्षक सजावट
४) चलचित्र देखावा
३) सुबक मूर्ती स्पर्धा
४) आरती स्पर्धा
सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेच्या अटी व नियम खालीलप्रमाणे
१) सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेचे प्रवेश अर्ज जवळील शिवसेना शाखा किंवा सोबत खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केल्यास उपलब्ध असतील.
२) सार्वजनिक गणेश दर्शन स्पर्धेचे प्रवेश अर्ज दिनांक १२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर २०२३ पर्यंत भरून द्यायचे आहेत.
३) ज्या सार्वजनिक मंडळांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे त्या सर्व मंडळ गणेश मंडळांनी आपल्या सभामंडपात दर्शनी भागात स्पर्धेचा बॅनर लावणे बंधनकारक आहे.
घरगुती गणेश दर्शन स्पर्धेच्या अटी व नियम खालीलप्रमाणे
१) स्वच्छ व स्पष्ट फोटो आणि व्हिडिओ किंवा रिल सोबत दिलेल्या ऑनलाईन लिंक वर फॉर्म मधील दिलेल्या पूर्ण माहितीसह अपलोड करावी.
२) दिनांक १९ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२३ पर्यंतच फोटो आणि व्हिडिओ अपलोड करता येतील.
लोकसभा क्षेत्रातील ५० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त कालावधी झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची माहिती सुद्धा घ्यायची आहे.