उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने दिव्यांग बांधवांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वेक्षण सुरू.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर महानगरपालिका समग्र शिक्षा विभागा अंतर्गत विशेष गरजा असणारे दिव्यांग मुला मुलींचे वयोगट 0 ते 18 सर्वेक्षण दिनांक 15 जून ते 30 जून 2024 या कालावधीत घ्यावयाचे आहे याकरिता अंगणवाडी शाळा, मनपा शाळा, खाजगी अनुदानित शाळा विनाअनुदानित शाळा यांनी समग्र शिक्षा विभागातील कर्मचारी यांच्या सहकार्याने उल्हासनगर क्षेत्रातील सर्व 21 प्रकारच्या दिव्यांग मुलांचे सर्वेक्षण करावयाचे आहे .याकरिता सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी शिक्षिका, अशा वर्कर यांनी समग्र शिक्षा विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे जे विद्यार्थी अंशतः अंध, पूर्णतः अंध,कर्णबधिर ,मूकबधिर अध्ययन अक्षम ,मतिमंद अस्थिव्यंग, बहु विकलांग आहे असे सर्व विद्यार्थ्यांना उल्हासनगरच्या कानाकोपऱ्यातून शोधून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणावयाचे आहे याकरिता शासनाने सर्व दिव्यांगांचे सर्वे करण्याबाबत आदेशित केले आहे. सदरचा सर्वे दिनांक 15 जून 2024 रोजी ते 30 जून 2024 या कालावधीत होणार आहे.
यामध्ये समग्र शिक्षा विभागाचे अध्यक्ष सन्माननीय आयुक्त डॉक्टर अजिज शेख यांच्या मार्गदर्शनाने सदर सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. उल्हासनगर कार्यक्षेत्रात दिव्यांग मुलांचे जास्तीत जास्त शोध व्हावे याकरिता माननीय उपायुक्त डॉक्टर सुभाष जाधव साहेब यांनी विविध प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याबाबत समग्र शिक्षा विभागाला आदेशित केले आहे व तसेच माननीय प्रशासन अधिकारी श्री दिपक धनगर यांनी समग्र शिक्षा विभागातील कर्मचारी यांना विविध उपाययोजना करून दिव्यांग विद्यार्थ्यांची यु-डायस मध्ये जास्तीत जास्त नोंदणी करावी असे आदेशित केले आहे. व तसेच डाएटचे प्राचार्य डॉक्टर संजय वाघ यांच्या मार्गदर्शनाने व सौजन्याने सदर सर्वेक्षणाचे कार्य उल्हासनगर क्षेत्रा मध्ये सुरू होणार आहे.