Breaking NewsheadlineHeadline TodayUlhasnagarUlhasnagar Breaking News
म्हारळगावात विजेचा लपंडाव…! महावितरण कंपनीच्या विरोधात म्हारळकर संतप्त…!
कल्याण ग्रामीण: नीतू विश्वकर्मा
मागील अनेक दिवसांपासून म्हारळगावात रोज ६ ते ७ तास वीज जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून मात्र गावातील राजकीय पुढारी मूग गिळून गप्प बसले आहेत.१लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावात इतर सुविधा बरोबर वीज कर्मचारी आणि गावात ट्रान्सफॉर्मर सुध्दा कमीच आहेत.गावात मोठ-मोठाले गृहसंकुल उभे राहिल्यामुळे बांधकाम व्यवसायिकांनी बिल्डिंग बांधल्या पण बिल्डिंगला स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नाही लावले आणि गावातील सार्वजनिक ट्रान्सफॉर्मरला जोडले व तो संपूर्ण लोड गावातील मोजक्याच ट्रांसफार्मरला आल्याने लाईट जात असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. दिवाळीच्या अगोदर हा विजेचा लपंडाव लवकरात लवकर बंद न झाल्यास महावितरण कार्यालयात आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.