उल्हासनगर येथील माजी सैनिक १५ ऑगस्ट रोजी करणार आत्महत्या.
उल्हासनगर- नीतू विश्वकर्मा
भारत पाकिस्तान युद्धात जिकरीने लढणाऱ्या एका माजी सैनिकाच्या विविध मागण्या मान्य झाल्या नसल्याने ते हतबल झाले असुन त्यानी टोकाची भूमिका घेत अखेर १५ ऑगस्ट रोजी या शासन प्रशासनाच्या विरोधात आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
उल्हासनगर कॅंप ४ येथील संभाजी चौका जवळ राहणारे माजी सैनिक सुभाष पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या दहा वर्षा पासून शासनाने दिलेल्या जागेला अधिकृत करण्यासाठी ठाणे जिल्हाधिकारी आणि महापालिका कार्यालयात पत्रव्यवहार करीत असताना आजतागायत त्यांची मालमत्ता रेग्युलाईज करण्यात आलेली नाही. या मुळे त्यांच्या कुटुंबियांचा विकास होऊ शकला नाही. त्यांनी सांगितले सेवा निवृत्तीनंतर सैनिकांनी व्यवसाय करून स्वतः चे उदरनिर्वाह करावे असे सैन्य दलात सांगितले जाते. त्यानुसार अंबरनाथ एमआयडीसी मध्ये २ हजार मीटर जागे ची मागणी केली असता फक्त सैनिक म्हणून ही जागा देण्यात आली नसल्याचा आरोप श्री पाटील यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की महापालिके ने काही वर्षांपूर्वी जिजामाता उद्यानाचा विकास करण्याचा कार्यादेश दिला होता परंतु त्या वेळी अभियंता व लेखा विभागाच्या अधिकाऱ्यांना लाच दिली नाही म्हणून महापालिका प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी त्यांची अनामत रक्कम जवळपास ५८ हजार रुपये रोखून ठेवले आहे. ते पैसे आता पर्यंत महापालिका प्रशासन देत नसल्याचा आरोप करीत सुभाष पाटील यांनी या व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. गेल्या दहा वर्षांपासून मी आणि माझे कुटुंब शासनाचे विविध भागात खेट्या मारून आजतागायत त्यांचे एक ही काम झालेले नाही. प्रत्येक कामा ला पैसांची मागणी केली जात असल्याने शेवटी कंटाळून स्वातंत्र्य दिनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पाटील यानी सांगितले आहे .