उल्हासनगर महापालिकेचा भोंगळ कारभार.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
शासनाच्या वतीने उल्हासनगर शहरासाठी 416.66 कोटी रुपयाची भुयारी गटार योजना मंजूर झाली आहे.व तसा शासन आदेशही निघालेला आहे.शासन निर्णय क्र.अमृत-2023/प्र.क्र.50/नवी-33 दिनांक 09 फेब्रुवारी 2023 रोजी या संदर्भामध्ये शासनाचा आदेशही काढण्यात आला आहे.व या आदेशानुसार लवकरच कामाला सुरवात होणार असे दिसते.काही दिवसात या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाला सुरवातही होईल.परंतु ही भुयारी गटार योजनेचे काम ज्या रस्त्यांवर होणार आहे त्याच रस्त्यावर सध्या महापालिका प्रशासनाच्या वतीने करोडो रुपयाची सिमेंट काँक्रेटची नविन रस्ते बनविण्याचे कामे सुरु करण्यात आले आहे.आता करोडो रुपये खर्चून बनवलेले रस्ते काही महिन्यात पुन्हा भुयारी गटारचे काम करतांना खोदावे लागणार आहेत.म्हणजेच आता या रस्त्यावर झालेला करोडो रुपयाचा खर्च वाया जाणार आहे व ही बाब गंभीर आहे.उल्हासनगर महापालिकेची आर्थिक स्थिती चांगली नाही ही बाब जगजाहीर आहे असे असतांना जनतेने भरलेल्या कराच्या पैशाची अशा प्रकारे विल्हेवाट लावणे योग्य नाही असे बंडू देशमुख म्हणाले.त्यामुळे ज्या ज्या रस्त्यावरून हया भुयारी गटारीचे काम होणार आहे त्या रस्त्यावरील नविन रस्ते बनविण्याचे काम तात्काळ थांबून महापालिकेच्या पैशाच होणार नुकसान त्वरित थांबवाव व हे पैसे भुयारी गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर याच रस्त्याच्यां दुरुस्तीसाठी खर्च करण्यात यावेत अशी मागणी ही मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्त अजिज शेख व शहर अभियंता प्रशांत सोळंकी यांच्याकडे केली आहे.