टायगर ची दत्तक प्रक्रिया पूर्ण होऊन आज टायगर नाविन पालकांसह परदेसी निघाला.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहराच्या हद्दीत असलेल्या वडोल गांवच्या एका कोपऱ्यात ३० डिसेंबर २०१८ रोजी नुकतेच जन्मलेले मुल रडत असताना स्थानिकाना दिसले, तेव्हा समाजसेवक व अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे यांनी त्या मुलाला उचलुन उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात नेले . तेथेच त्या मुलाचे नाव टायगर म्हणुन ठेवुन त्याच्यावर उपचार सुरु केले . आता हाच टायगर शिवाजी रगडे व जयश्री रगडे या दापंत्याच्या प्रयत्नाने नवी मुंबई च्या एका वसतीगृहात बरा झाला . दरम्यान आता हाच टायगर मोठा झाला आहे , दरम्यान त्याला इटली येथिल एका दापंत्याने दत्तक घेतले असुन आज तो इटलीला रवाना झाला आहे . त्याला निरोप देताना टायगर चे जीवनदाते शिवाजी रगडे व त्याच्या पत्नि जयश्री रगडे यांचे अश्रृ अनावर झाले . त्याला भावनिक वातावरणात निरोप देवुन त्याचे पुढील जीवन सुख समृध्दीचे जावो अशी प्रार्थना केली .
३० डिसेंबर २०१८ रोजी उल्हासनगर येथिल वडोलगाव मधे एक नुकताच जन्मलेला मुलगा सापडला. त्याला समाजसेवक शिवाजी रगडे यांनी मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले . त्याचे टायगर असे नाव ठेवुन त्याच्यावर उपचार सुरु होते . काही दिवस उपचार झाले, परंतु जन्मताच त्याला नालीत टाकल्यामुळे पोटाला इन्फेक्शन व डोक्याला मार लागल्याने प्रकृती अतिशय गंभीर होती. म्हणून बाल न्यायालयाच्या परवानगीने शिवाजी रगडे यांनी स्वतः खर्च करायची तयारी दर्शवली आणि त्या टायगर ला पोलिस संरक्षणात खाजगी रुग्णालयात उपचार करण्याची परवानगी शिवाजी रगडे व जयश्री रगडे यांना मिळाली.
दरम्यान खाजगी रुग्णालयात जवळपास पंधरा दिवस उपचार झाल्यानंतर पोटाचे इन्फेक्शन बरे झाले. परंतु डोक्यातील इजा बरी होत नसल्याने एमआरआय काढल्यावर कळाले की डोक्यामध्ये मेंदूला गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली आहे. तेव्हा टायगर ला वाडीया हॉस्पिटल मध्ये स्थलांतरित करण्यात आले . शिवाजी रगडे यांनी अगोदरच खाजगी रुग्णालयात मोठया प्रमाणात खर्च केला होता. व वाडिया हॉस्पिटल मध्ये लागणारा हा खर्च रगडे दापंत्याला परवडणारा नव्हता. म्हणून केटो या एका फंड रेसिंग एन जी ओ च्या माध्यमातून दहा लाख रुपये वाडीया हॉस्पिटल च्या खात्यात जमा करून टायगर वर वाड्यामध्ये उपचार सुरु झाले. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आणि त्या यशस्वीही झाल्या . त्यामुळे टायगर सुदृढ झाला. त्यानंतर महिला बालकल्याण समितीच्या आदेशाने टायगरला नवी मुंबई मधील नेरूळ येथे विश्व बालक केंद्रामध्ये दाखल करण्यात आले . तर त्या महिला व बालकल्याण समितीने रगडे दांपत्याला टायगर ला भेटण्याची अधिकृत परवानगी दिली होती. त्यामुळे अधून मधून त्याच्या वाढदिवसाला देखील रगडे दापंत्य नियमितपणे जावुन टायगर चा वाढदिवस साजरा करुन त्याच्या आरोग्या विषयक चौकशी करत होते . टायगर आता एकदम ठणठणीत झाल्यामुळे त्याची दत्तक प्रक्रिया सुरू होती . शेवटी इटलीमधील एक दापंत्य टायगरला दत्तक घेतण्यासाठी पुढे आले . त्यांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करुन आज शेवटी टायगर इटलीला रवाना झाला . दरम्यान त्या अगोदर
विश्व बालक केंद्राने टायगरचे जीवनदाते शिवाजी रगडे व त्यांच्या पत्नि जयश्री रगडे यांना शेवटचे टायगरला भेटायला व त्याच्या नवीन पालकांना भेटायला बोलावले. मात्र ही शेवटची भेट अतिशय भावनात्मक असल्याने रगडे दापंत्याला ही भेट सोप नव्हती . शिवाजी रगडे व जयश्री रगडे यांच्यासह त्या नवीन मातेच्या डोळ्यात देखील अश्रू उभे ठाकले होते . परंतु रगडे दापंत्यानी दिलेली प्रतिक्रिया अशी होती की आम्ही टायगर ला दत्तक मागीतले होते. मात्र कायद्यानुसार जरी आम्हाला त्याचे पालकत्व मिळाले नाहीं, तरी त्याचासाठी जे काही करता आले ते केले. परंतु आज टायगरला त्याच्या हक्काचे चांगले आई-वडील मिळालेले आहेत. व टायगर खूप मोठा व्हावा असे आशीर्वाद देऊन टायगरला साश्रृ नयनाने रवाना केले .
आज टायगर विदेशी निघालेला आहे व सगळ्यांची हीच प्रतिक्रिया येत आहे की टायगर ने ज्या प्रकारे मृत्यूशी झुंज देऊन जगण्याची लढाई जिंकली त्याचप्रमाणें आपल्या आयुष्यात देखील असाच लढून एक खूप मोठा माणूस बनेल ,असे आशिर्वाद देवुन अपेक्षा व्यक्त केल्या .