महापालिकेत प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रशासना कडून कुचबंना केली जाते.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
“महापालिकेत प्रशासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची प्रशासना कडून कुचबंना केली जाते.”
उल्हासनगर शहराती लोकसंख्या ही जवळपास 7 ते 8 लाखाच्या आसपास आहे.जवळपास पावणेदोन मालमत्ता या शहरात आहे.व यातील बरेच नागरिक हे आपल्या शासकीय कामासाठी दररोज महापालिकेत येत असतात परंतु या नागरिकांना अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी तासंतास अधिकाऱ्यांच्या कॅबीनच्या बाहेर टात्कळत उभ राहावे लागते.कारण अधिकारी हे कधी मिटिंगच्या नावाखाली,कधी VC च्या नावाखाली तर कधी साईट व्हिजिटच्या नावाखाली व्यस्त असतात किंवा आयुक्त कार्यालयात असतात तर कधी बाहेर असतात त्यामुळे शहराती नागरिकांना तिन तिन चार चार तास या अधिकाऱ्यांच्या कॅबीन बाहेर ताटकळत उभ राहवं लागत.यातील बरेच नागरिक हे कामाचा खडा करून महापालिकेत या आशेने येतात की साहेबांना भेटलं की आपल काम होईल.परंतु या नागरिकांना साहेबांची वाट बघत तासंतास उभ राहावे लागेते.कधीकधी तर आठ आठ दिवस महापालिकेच्या फेऱ्या माराव्या लागतात व ही बाब निषेधार्थ आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी मागणी केली आहे की सोमवार ते शुक्रवार दररोज कमीतकमी 3 ते 5 – 30 या वेळेत अधिकाऱ्यांना आपआपल्या कॅबीन मध्ये उपस्थित राहण्यासाठी आयुक्तांनी आदेश दयावेत.जेणे करून शहरातील नागरिकांची कामे पण वेळेत होतील व महापालिकेच्या उत्पन्नात ही वाढ होईल.आमच्या मागणीच्या गांभीर्याने विचार न केल्यास शहरातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आंदोलन करावे लागेल असा ईशारा ही मनसेच्या वतीने देण्यात आला आहे.