Ulhasnagar News: अखिल भारतीय जिवा सेना उल्हासनगर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक शिवरत्न जिवाजी महाले यांचा ३८८ वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांचे अत्यंत विश्वासू अंगरक्षक प्रतापगडावरिल अफझलखान भेटीच्या रणसंग्रामात अतुलनीय शौर्य दाखवत स्वराज्यावर चालून आलेल्या संकटाला परतवून लावताना छत्रपती शिवाजी महाराज्यांचे प्राण वाचवून “होता जिवा म्हणून वाचला शिवा” या गौरवाने इतिहासात अजरामर झालेले शिवरत्न जिवाजी महाले यांचा ३८८ वा जन्मोत्सव सोहळा अखिल भारतीय जिवा सेना उल्हासनगर (Ulhasnagar) तालुक्याच्या वतीने मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला.
संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra) पहिले भिंती शिल्प असणाऱ्या जिजामाता उद्यान,मराठा सेक्शन -३२,उल्हासनगर कँम्प नंबर -४ येथील शिवस्मारकातील जिजाऊ व बाल शिवाजी यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून शिवरत्न जिवाजी महाले यांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी माजी नगरसेवक सुरेंद्र सावंत,अखिल भारतीय जिवा सेनेचे महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख,मनोज कोरडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
उल्हासनगर शहरातील नाभिक समाज्याचे जेष्ठ कार्यकर्ते एम आर निकम,अशोक जगताप, मोहन क्षिरसागर,राजन चव्हाण आणि मधुकर कोकाटे यांच्यासह नाभिक बांधव व शिवप्रेमी नागरिकांनी शिवरत्न जिवाजी महाले यांना अभिवादन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवरत्न जिवाजी महाले जन्मोत्सव समितीचे मंगेश सायखेडे,अंकुश श्रीखंडे,सतिश महाले,संदिप रावताळे,सोनु चावके आणि सचिन पवार यांनी अथक परिश्रम घेतले.