उल्हासनगर – ४ येथील लेपरिसी कॉलनी येथील जागेवर महानगरपालिकेच्या माध्यमातून कुष्टरोगी बांधवाकरिता दवाखानाचे भूमिपूजन तसेच धनादेश देखील वाटप करण्यात आले.
उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर – ४ येथील लेपरिसी कॉलनी येथील जागेवर महानगरपालिकेच्या माध्यमातून कुष्टरोगी बांधवाकरिता दवाखाना उभारण्यात यावा तसेच महानगरपालिके मार्फत देण्यात येणाऱ्या अनुदानात वाढ करण्यात यावी या माझ्या मागणीला मुहूर्त स्वरूप आज प्राप्त झाले असून आज लेपरिसी कॉलनी येथे दवाखाना उभारण्याची पायाभरणी माझ्या हस्ते पार पडली. तसेच याप्रसंगी लेपरिसी कॉलनीतील कुष्टरोगी बांधवांना महानगरपालिकेमार्फत देण्यात येणाऱ्या १०००/- रुपयांच्या अनुदानाऐवजी २५००/- रुपयांचे अनुदान मिळणार असून त्याचे धनादेश देखील वाटप करण्यात आले.
कुष्टरोगी बांधवांना दररोज त्यांच्यावर उपचार करणे, पट्टी बदलणे याकरिता येत असलेली अडचण लक्षात घेत लेपरिसी कॉलनी येथील जागेवर महानगरपालिकेच्या माध्यमातून दवाखाना उभारण्यात यावा याकरिता नेताजी सुभाष कुष्ठ पीडित स्वावलंबन संघ (कुष्ठ वसाहत) यांच्या मागणीनुसार महानगरपालिकेकडे पाठपुरावा केला होता. या दवाखान्यामुळे कुष्टरोगी बांधवांसोबतच लगतच्या परिसरातील नागरिकांना ही लाभ होणार आहे. याप्रसंगी उपस्थितीत कुष्टरोगी बांधवांशी संवाद साधत येणाऱ्या काळातही आपल्या सेवेत सदैव असल्याची ग्वाही दिली.
या कार्यक्रमाला शिवसेनेचे उल्हासनगर महानगरप्रमुख श्री. राजेंद्र चौधरी, शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण, महानगरपालिकेचे आयुक्त श्री. अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त सौ. करुणा जुईकर, युवासेनेचे श्री. सुशिल पवार, नेताजी सुभाष कुष्ठ पीडित स्वावलंबन संघाचे सल्लागार श्री. प्रदीप गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.